पावसाचा धुमाकूळ! किल्ले रायगडावर अनेक ठिकाणी पूर परिस्थिती, पर्यटकांना 31 जुलैपर्यंत बंदी

रायगडावर ढग फुटीप्रमाणे पाऊस कोसळला. यामुळे किल्ले रायगडाच्या पायरी मार्गाला ओढ्याचे स्वरूप प्राप्त झालं होतं.

पावसाचा धुमाकूळ! किल्ले रायगडावर ढगफुटी; अनेक ठिकाणी पुरपरिस्थिती

पावसाचा धुमाकूळ! किल्ले रायगडावर ढगफुटी; अनेक ठिकाणी पुरपरिस्थिती

Weather update : किल्ले रायगडावर काल मध्यरात्री ढग फुटी प्रमाणे पाऊस कोसळला. यामुळे किल्ले रायगडाच्या पायरी मार्गाला ओढ्याचं स्वरूप प्राप्त झालं होतं. ओढ्यातून ज्याप्रमाणे खळाळून पाणी वहाते त्याप्रमाणे अतिशय अक्राळविक्राळपणे पायरी मार्गावरून पाणी वहात होतं.

बुरुज आणि कड्यांवरून अक्षरशः धबधब्याप्रमाणे पावसाचं पाणी वाहिलं. ही भयानक परिस्थिती किल्ले रायगडाच्या महादरवाजा परिसरात निर्माण झाली होती. यावेळी मोठ्या संख्येत पर्यटक शिवप्रेमी रायगडावर होते. अनेक पर्यटक या दरम्यान तारेवरची कसरत करत वहात्या पाण्यात आडकून पडले.

Exit mobile version