CM Devendra Fadanvis on Manoj Jarange for his statement about his Mother : कित्येक महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेतली. तेव्हा त्यांनी फडणवीसांच्या आईबाबत वापरलेल्या अपशब्दांबाबत चित्रा वाघांसह फडणवीसांवर देखील जोरदार हल्ला केला. त्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
लोकशाहीमध्ये सर्वांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे लोकशाही पद्धतीने कुणी आंदोलन करणार असेल तर सरकार कुणाला रोखणार नाही. मात्र त्याचवेळी हिंदुंचा सर्वांत मोठा सण हा गणेशोत्सव आहे. त्यामुळे या सणामध्ये कुठलंही विघ्न येऊ नये. अशी आमची आपेक्षा आहे. तसेच मला विश्वास आहे की, आंदोलक देखील हिंदुंच्या या सणामध्ये कोणताही खोडा घालणार नाहीत. कारण आपल्या सर्वांच्या मागण्या जरी वेगवेगळ्या असल्या तरी छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यात हिंदुंचा सण साजरे करण्यामध्ये कोणतेही विघ्न येऊ दिले नाही. तसेच परकीय आक्रमणं झाली तेव्हा त्यांनी त्यांचा नि:पात केला. मात्र ज्याला आंदोलन करायचं त्यांनी करावं.
अखेर ट्रम्प यांनी सही केलीच! भारतावरील अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ उद्यापासून लागू; अधिसूचना जारी
तसेच यावेळी पत्रकारांनी फडणवीसांना मनोज जरांगे यांनी त्यांच्यावर केलेल्या खालच्या भाषेतील टीकेवर विचारले असता ते म्हणाले की, जो स्वत:ला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा मानत असेल तो कधीही खालची भाषा वापरणार नाही. कुठल्या स्त्रीबद्दल, कुणाच्या आईबद्दल वाईट आणि चुकीचं बोलणार नाही. तसेच या प्रकरणावर मी प्रतिक्रिया द्यावी. हे मला योग्य वाटत नाही. प्रत्येकाचं बोलणं त्यांना लख लाभ माझ्या पाठीशी आईचा आशीर्वाद आहे. असं म्हणत फडणवीसांनी जरांगेंना उत्तर दिलं आहे.
गणपतीसाठी कोकणवासीयांसाठी विशेष रेल्वेगाडी!
कोकणासाठी 367 रेल्वेगाड्या दिल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानतो.
भाजपा मुंबईच्या वतीने 550 पेक्षा अधिक बसेस देखील गणेशभक्तांसाठी कोकणात जाणार आहेत.(मुंबई | 25-8-2025)#Mumbai #GaneshUtsav #Konkan pic.twitter.com/gf52UnmjG5
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 25, 2025
काय म्हणाले होते मनोज जरांगे?
मी देवेंद्र फडणवीसांच्या आईवरून काहीही बोललो नाही. मात्र तसे झाले असल्यास ते शब्द मी मागे घेतो. पण आरक्षण द्या. कारण आमच्याही आया-बहिणी रात्रंदिवस कष्ट करतात. त्यांचे मुलं फाशी घ्यायला लागले आहेत. तुमच्या आई प्रमाणे आमच्या आईला माना आणि आरक्षण द्या. तसेच मी मी देवेंद्र फडणवीसांच्या आईवरून काहीही बोललो नाही. मात्र तसे झाले असल्यास ते शब्द मी मागे घेतो. कारण आमचे मनं मोठे आहेत. तुमच्यासारखा आठमुठेपणा नाही.
‘नूर बेगम’च्या गायनप्रवासाची सुरेल झलक, ‘सॉन्ग्स ऑफ पॅराडाईज’चा हृदयस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित!
पोलिसांना मारहाणीचे आदेश दिले. तेव्हा ती आमची आई नव्हती का? ती तेव्हा रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. कोण प्रवक्ता आहे. तो शेण खात आहे. कोण वाघीन आहे ती, तिला आमची आई नाही का दिसली. सरकारच्या शेळ्या कुठवर सांभाळती? माझ्या नादी लागू नको. आमच्या आया-बहिणींवर 360 चा गुन्हा दाखल झाला आहे. तुझ्यावर केला तर जमेल का? नाही तर मी तुझी सगळी माहिती काढेल. तुला आमदार खासदार व्हायचं असेल म्हणून तुला त्याच्या आईची माया येत असेल. असं म्हणत जरांगे यांनी चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे.
स्वत: च्या आईचं सोशल मिडीयावर टाकलं. आमच्या आईचं का नाही टाकलं की, हल्ला झाला म्हणून. तेव्हा महिलांनीच पोलिसांना मारल्याचा आरोप केला. पोलिस काय तुमचे आहेत का? नाटकं करतो. तुझी आई तुला प्रिय आहे. तर आमची आई आम्हाला प्रिय आहे. येत आहे मुंबईला. तु मुख्यमंत्री आहे तुला लाज वाटली पाहिजे. अशा भाषेत जरांगे यांनी फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं आहे.