Download App

कोकाटे गेलेच! मंत्रिपदावरून खांदेपालट ठरलं? फडणवीस-तटकरेंच्या बैठकीत कोणता निर्णय?

Devendra Fadnavis And Sunil Tatkare Meeting : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलं (Devendra Fadnavis) आहे. रमी जाहिरात प्रकरणानंतर कोकाटेंवर विरोधी पक्षांकडून टीकेची झोड उठली. सत्ताधाऱ्यांमध्येही नाराजीचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर, कोकाटेंच्या बदल्याचा पर्याय गंभीरपणे (Sunil Tatkare) विचाराधीन असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, या विषयावर नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित गट) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात महत्त्वाची बैठक झाली. बैठकीदरम्यान कोकाटेंना मंत्रिपदावरून (Maharashtra Politics) बाजूला करण्याचा पर्याय अधिक ‘सोयीस्कर’ राहील, अशी भूमिका समोर आल्याचं कळतं. मंत्रिपदावर राहून निर्माण होणारा वाद सरकारसाठी अडचणीचा ठरू शकतो, त्यामुळे योग्यवेळी योग्य निर्णय घ्यावा लागेल, अशी चर्चा या बैठकीत झाली.

मराठीचा अभिमान, पण भाषेवरून मारहाण करणं खपवून घेणार नाही; CM फडणवीसांनी ठणकावलं

फडणवीस आणि तटकरेंचं मत काय?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी कोकाटेंच्या वागणुकीवर नाराजी व्यक्त करत म्हटलं होतं की, मंत्री काहीही बोलले तरी ते सरकारच्या प्रतिमेला साजेसं नाही. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही यावर उघडपणे नाराजी व्यक्त करत कोकाटेंच्या वक्तव्यांमुळे पक्षाचीही अडचण होते, असं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे कोकाटेंचं मंत्रिपद काढून घेण्याचा विचार आता अंतिम टप्प्यात आहे, अशी चर्चा सुरु आहे.

कोकाटेंचं म्हणणं काय?

मात्र, खुद्द माणिकराव कोकाटे यांनी आपल्यावर झालेले आरोप फेटाळले आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, रमीची जाहिरात माझ्यासमोर आली खरी, पण मी ती स्कीप करत होतो. त्यामध्ये माझं काहीच चुकलं नाही.” याशिवाय त्यांनी माध्यमांशी बोलताना राजीनामा देण्याचा किंवा चुकीचं वागण्याचा कुठलाही हेतू नव्हता, असंही स्पष्ट केलं. या सगळ्या गोंधळावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही थेट भाष्य केलं आहे. माझी माणिकराव कोकाटे यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा होणं आवश्यक आहे. त्यांनी काही बोलताना ‘भिकारी’ असं शब्द वापरल्याचं मला सांगण्यात आलं आहे. यावरही मी त्यांच्याशी बोलणार आहे. मुख्यमंत्री आणि मी एकत्रितपणे निर्णय घेऊ, असं अजित पवारांनी म्हटलंय.

Shirdi : साईबाबा मंदिराला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; पोलिस प्रशासन सतर्क…

खांदेपालटाची शक्यता अधिकच

या पार्श्वभूमीवर आता स्पष्ट आहे की कोकाटेंच्या स्थानावर नव्या चेहऱ्याची शक्यता निर्माण झाली आहे. मंत्रिमंडळात फेरबदल किंवा ‘डॅमेज कंट्रोल’साठी केवळ कोकाटेंना हटवणं नव्हे, तर त्यांच्या जागी इतर कोणाची नेमणूक करणे. हा पर्याय अधिक सोयीस्कर मानला जातोय. त्यामुळे येत्या आठवड्यात या संपूर्ण प्रकरणावर काही ठोस निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी शक्यता आहे.

 

follow us