महागाईत शेतकऱ्यांना दिलासा; ‘या’ दिवशी होणार कर्जमाफी; CM फडणवीसांची मोठी घोषणा

Devendra Fadnavis On Loan Waiver :  अवकाळी पाऊस आणि आता वाढणाऱ्या महागाईमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ होताना दिसत आहे.

Devendra Fadnavis On Loan Waiver

Devendra Fadnavis On Loan Waiver

Devendra Fadnavis On Loan Waiver :  अवकाळी पाऊस आणि आता वाढणाऱ्या महागाईमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ होताना दिसत आहे. राज्यातील अनेक ठिकाणी एप्रिल आणि मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. तर आता या महागाईत एक दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीबाबत मोठी घोषणा केली आहे. येत्या 30 जूनपूर्वी सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की,  राज्याच्या खरीप हंगामाची पूर्वतयारीची बैठक घेतली आहे. त्या आधी बँकर्ससोबत (Banks) कर्जवाटपासंदर्भात बैठक झाली आहे. या बैठकीत अधिकाधिक शेतकऱ्यांना कर्ज कसं मिळेल याबाबत चर्चा करण्यात आली आहे. जिल्हा सहकारी आणि ग्रामीण बँकेने मिळून 67 टक्के कर्ज दिलं आहे तर 26 टक्के कर्ज हे इतर राष्ट्रीयकृत बँकांकडून देण्यात येतय. परंतु राष्ट्रीयकृत बँकांकडून त्यांचे 80 टक्के कर्जवितरणाचं टार्गेट पूर्ण होत नाही ते त्यांनी पूर्ण केलं पाहिजे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

तसेच कर्जाचं वाटप करताना शेतकऱ्यांकडून सीबील स्कोअरची (CIBIL Score) मागणी करु नये, शेतकऱ्यांना कसलीही अडचण करु नये असे निर्देश देखील बँकांना देण्यात आले असल्याची देखील माहिती फडणवीस यांनी दिली.

इतर राष्ट्रांमध्ये संघर्ष पण भारतीय अर्थव्यवस्थेला फटका का? जाणून घ्या कारण

माध्यमांशी बोलताना फडणवीस पुढे म्हणाले की, सगळ्या बँकांसोबत कर्जमाफी (Loan Waiver) संदर्भात चर्चा केली आहे. कर्जमाफीची माहिती कोणत्या फॉरमॅटमध्ये द्याची याबाबत देखील चर्चा झाली असून वेळेत कर्जमाफी पूर्ण करु शकू याचं नियोजन केलं आहे.

यावेळी एल निनोचं संकट असल्याने पावसाचा अंदाज 88 टक्के वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे हवामानाच्या अंदाजानुसार कसं नियोजन करता येईल यावर देखील चर्चा करण्यात आली आहे. आम्ही 30 जूनपूर्वी कर्जमाफी करणार आहोत, पुढच्या हंगामासाठी आपले शेतकरी कर्जासाठी पात्र असणार आहेत असं यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Exit mobile version