पेट्रोल पंपावर गर्दी वाढली; CM फडणवीस म्हणाले, काहीतरी गडबड अन्…

CM Devendra Fadnavis On Petrol Diesel Crisis : राज्यातील अनेक भागात सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या साठ्यात कमी आल्याने पेट्रोल

CM Devendra Fadnavis On Petrol Diesel Crisis

CM Devendra Fadnavis On Petrol Diesel Crisis

CM Devendra Fadnavis On Petrol Diesel Crisis : राज्यातील अनेक भागात सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या साठ्यात कमी आल्याने पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांची पेट्रोल पंपावर मोठी गर्दी दिसून येत आहे. अनेक पेट्रोल पंपावर लांबचलांब गर्दीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पेट्रोल पंपावर होणाऱ्या गर्दीमुळे विरोधक देखील आता महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहे. तर दुसरीकडे आता या सर्व प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या साठेबाजी करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, या संदर्भात सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना सूचना केलेल्या आहेत. शेतकऱ्यांना डिझेल (Petrol Diesel Crisis) लागेल ते उपलब्ध करुन द्या. परंतु शेतकऱ्यांच्या नावाखाली कोणी साठेबाजी करत असेल तर त्यावरही लक्ष ठेवा कारण काही भागात अचानक 20 ते 30 टक्क्यांनी पेट्रोल आणि डिझेलची मागणी वाढल्याचे दिसते असं माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

काहीतरी गडबड असण्याची शक्यता – मुख्यमंत्री फडणवीस

माध्यमांशी पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, दरवर्षी आपल्याला किती इंधन लागते हे आपल्याला माहिती आहे मात्र त्यात अचानक 20 ते 30 टक्के वाढ होत असेल तर त्यात काहीतरी गडबड असण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना त्रास होऊ नये अशा दृष्टीने काही उपाययोजना करण्यास सांगितलेल्या आहेत. काही ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी आरसी बुक बघून त्यांना डिझेल देणे सुरु केले आहे. मला असे वाटते की, आपत ते करण्याचा प्रयत्न करु असं देखील माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

नागरिकांना गुणवत्तापूर्ण वीजपुरवठा मिळावा, यासाठी प्रशासनाने जबाबदारीने काम करावे; चंद्रकांत पाटील-

देशात पुन्हा पेट्रोल – डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ

तर दुसरीकडे देशात पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. देशात गेल्या दहा दिवसात तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ पाहायला मिळत आहे. आजपासून लागू झालेल्या नवीन दरानुसार, पेट्रोल 87 पैसे तर डिझेल 91 पैसे प्रति लिटर महाग झाले आहे. यापूर्वी सरकारने 19 मे रोजी पेट्रोलच्या दरात 87 पैशांची आणि डिझेलच्या दरात 91 पैशांची वाढ केली होती. तर 15 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये प्रत्येकी दरात 3 रुपयांची वाढ करण्यात आली होती.

Exit mobile version