Download App

गुडन्यूज! राज्यात 16 लाख युवकांना मिळणार नोकऱ्या; दावोसमध्ये 54 करारांवर शिक्कामोर्तब

दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये दुसऱ्या दिवसांपर्यंत महाराष्ट्रात 15.70 लाख कोटी गुंतवणुकीचे 54 करार.

Devendra Fadnavis in Davos : दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे (Davos Summit 2025) चे सोमवारी उद्घाटन झाले. त्यानंतर मंगळवारी पहिल्याच दिवशी महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या नेतृत्त्वात विक्रमी 4 लाख 99 हजार 321 कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले. यातून सुमारे 92,235 इतकी रोजगारनिर्मिती होणार आहे. त्यानंतर बुधवारी दुसऱ्या दिवशीपर्यंत 15.70 लाख कोटी गुंतवणुकीच्या 54 सामंजस्य करारांवर सह्या झाल्या आहेत. यातून 15.95 लाख रोजगार निर्मिती होईल अशी शक्यता आहे.

मोठी बातमी! महाराष्ट्रात 3 लाख रोजगाराच्या संधी, CM फडणवीसांनी केला रिलायन्ससोबत 3 लाख कोटींचा करार

या सामंजस्य करारांमध्ये मोठ्या गुंतवणुकीचे करार झाले आहेत. यामध्ये रिलायन्स समुहाचा मोठा करार आहे. पेट्रोकेमिकल्स, पॉलिस्टर, नवीनीकरणीय ऊर्जा, बायोएनर्जी, हरित हायड्रोजन, ग्रीन केमिकल्स, औद्योगिक क्षेत्रविकास, रिटेल, डेटा सेंटर्स, टेलिकम्युनिकेशन्स, रियल इस्टेट या क्षेत्रात 3,05,000 कोटींची गुंतवणूक होणार आहे. या करारांतून साधारण तीन लाख नवीन रोजगार उपलब्ध होतील असा अंदाज आहे.

दुसरी मोठी गुंतवणूक अॅमेझॉन कंपनी करणार आहे. या कंपनीची साधारण 71 हजार 795 कोटी रुपये इतकी गुंतवणूक असेल. एनएमआर क्षेत्रात डेटा सेंटर्सच्या माध्यमातून या गुंतवणुकीतून 83 हजार 100 इतके रोजगार निर्माण होतील असा अंदाज आहे. या एकूण करारांपैकी उद्योग विभागाने 11.71 कोटींचे करार केले आहेत. तसेच एमएमआरडीने 3.44 लाख कोटी तर सिडकोने 55 हजार 200 कोटींचे करार केले आहेत.

महत्वाची गुंतवणूक व रोजगार निर्मिती

सिएट
ऑटोमोबाइल, ईव्ही
गुंतवणूक 500 कोटी
रोजगार 500
नागपूर

व्हीआयटी सेमिकॉन्स
इलेक्ट्रॉनिक्स
गुंतवणूक 24 हजार 437 कोटी
रोजगार 33 हजार 600
रत्नागिरी

टाटा समूह
बहुविध क्षेत्रात
गुंतवणूक 30 हजार कोटी

रुरल एन्हान्सर्स
रुग्णालय
गुंतवणूक 10 हजार कोटी

पॉवरिन ऊर्जा
हरित ऊर्जा
गुंतवणूक 15 हजार 299 कोटी
रोजगार 4 हजार

ओपन ओरिजिन इंडिया इंडस्ट्रीज
हरित ऊर्जा
गुंतवणूक 15 हजार कोटी
रोजगार 1 हजार

युनायटेड फॉस्फरस लि.
हरित ऊर्जा
गुंतवणूक 6 हजार 500 कोटी
रोजगार 1 हजार 300

ईरुलर्निंग सोल्यूशन्स
शिक्षण
गुंतवणूक 20 हजार कोटी
रोजगार 20 हजार

ऑलेक्ट्रा ईव्ही
ऑटोमोबाइल, ईव्ही
गुंतवणूक 3 हजार कोटी
रोजगार 1 हजार

रिलायन्स इंडस्ट्रीज लि.

पेट्रोकेमिकल्स, पॉलिस्टर, नवीनीकरणीय ऊर्जा, हरित हायड्रोजन, ग्रीन केमिकल्स, औद्योगिक क्षेत्रविकास, रिटेल, डेटा सेंटर्स, टेलिकम्युनिकेशन्स
गुंतवणूक 3 लाख 5 हजार कोटी
रोजगार 3 लाख

ग्रिटा एनर्जी
स्टील आणि मेटल्स
गुंतवणूक 10 हजार 319 कोटी
रोजगार 3 हजार 200

follow us