मोठी बातमी! महाराष्ट्रात 3 लाख रोजगाराच्या संधी, CM फडणवीसांनी केला रिलायन्ससोबत 3 लाख कोटींचा करार
Maharashtra government signs agreement with Reliance : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) हे दावोसच्या दौऱ्यावर आहेत. फडणवीस यांनी या दौऱ्यात अनेक कंपन्यांच्या भेटी घेतल्या असून, महाराष्ट्रात (Maharashtra)त्यांना गुंतवणुकीसाठी निमंत्रित केलं. या माध्यमातून महाराष्ट्रात हजारो कोटींची गुंतवणूक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या दौऱ्यात आता फडणवीसांनी रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) सोबत करार केलाय. रिलायन्स महाराष्ट्रात 3 लाख 5 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजसोबत ₹3,05,000 कोटींचा ऐतिहासिक सामंजस्य करार, सुमारे 3 लाख रोजगार संधी…
( दावोस | 22-1-2025)@wef @RIL_Updates#WEF25 #MahaAtDavos #UnstoppableMaharashtra pic.twitter.com/kxkSGW4im6
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 22, 2025
अभिषेकची ‘तुफानी’ खेळी, पहिल्या टी-20 मध्ये भारताचा शानदार विजय
दावोसमध्ये पहिल्याच दिवशी 6 लाख कोटींची गुंववणूक झाल्याची माहिती फडणवीस यांनी केली. त्यानंतर आज राज्य सरकारने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड सोबत करार केला. हा 3 लाख 5 हजार कोटीं रुपयांचा ऐतिहासिक सामंजस्य करार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियाद्वारे या करारबद्दलची माहिती दिली. त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, रिलायन्स इंडस्ट्रीजसोबत आज एमोयू महाराष्ट्र सरकारने केलाय. 3 लाख पाच हजार कोटींचा हा एमओयू आहे. या एमोयूच्या माध्यमातून रिलायन्स पेट्रो केमिकल, बायो एनर्जी, डेटा सेंटर, हॉस्पिटॅलिटी, रिअल इस्टेट, किरकोळ विक्री, उच्च तंत्रज्ञान उत्पादन या क्षेत्रात गुंवतणूक करणार आहे. या करारामुळं विविध क्षेत्रात ३ लाखांहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत, असं फडणवीस म्हणाले.
IND vs ENG : अर्शदीप सिंगने रचला इतिहास, मोडला युजवेंद्र चहलचा ‘हा’ मोठा विक्रम
दरम्यान, दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत पहिल्या दिवशी महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ६ लाख २५ हजार ४५७ कोटी रुयपांचे गुंतवणूक करार केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विविध कंपन्यांच्या प्रमुखांची भेट घेतल्या आणि त्यांना महाराष्ट्रात गुंतवणूकीसाठी निमंत्रित केलं.
टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचीही फडणवीस यांनी काल भेट घेतली. टाटा ग्रुप ३० हजार ००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
कार्ल्सबर्ग ग्रुपचे सीईओ जेकब अरुप अँडरसन यांचीही फडणवीसांनी भेट घेतली. कार्ल्सबर्ग ग्रुपने महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिलंय. देवेंद्र फडणवीस यांनी रिटेल क्षेत्रात काम करणाऱ्या लुलू ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक एम.ए. युसुफ अली यांचीही भेट घेतली. त्यांनी नागपूरमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे आणि महाराष्ट्रात विस्तार करण्यासही ते तयार आहेत.