अभिषेकची ‘तुफानी’ खेळी, पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा शानदार विजय

  • Written By: Published:
अभिषेकची ‘तुफानी’ खेळी, पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा शानदार विजय

IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील (IND vs ENG) पहिल्या सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी करत इंग्लंडचा 7 विकेट्सने पराभव करत पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात इंग्लंडने भारताला 133 धावांचे लक्ष्य दिले होते.

133 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीर संजू सॅमसन (Sanju Samson) आणि अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) पहिल्या षटकापासून इंग्लंडला बॅकफूटवर ठेवले होते. अभिषेकने 34 चेंडूत 79 धावांची तुफानी खेळी केली तर 20 चेंडूत 26 धावा करून संजू सॅमसन बाद झाला. त्यानंतर हार्दिक पांड्या आणि तिलक वर्माने या सामन्यात भारताला विजय मिळवून दिला.

भारताकडून अभिषेक आणि संजू सॅमसनने पहिल्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी केली होती. जोफ्रा आर्चरने पाचव्या षटकात भारताला पहिला धक्का देत संजू सॅमसनचा विकेट घेतला आणि त्यांनतर लागेल भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवलाही बाद केले. सूर्याला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर  भारताकडून अभिषेक आणि तिलक वर्माने तिसऱ्या विकेटसाठी  84 धावांची भागीदारी केली. या दरम्यान अभिषेकने फक्त 20 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. तर तिलकने 16 चेंडूत तीन चौकारांसह 19 धावा केल्या आणि नाबाद राहिला. त्याच्यासोबत  हार्दिक पंड्या 3 धावांवर नाबाद राहिला.

तर दुसरीकडे  नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय संघाने दमदार सुरुवात करत पहिल्या तीन षटकात इंग्लंडचे दोन विकेट घेतले त्यानंतर जोस बटलरने शानदार फलंदाजी करत  44 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांसह 48 धावांची खेळी केली. भारताकडून वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने 23 धावा देऊन 3 विकेट्स घेतल्या तर अर्शदीप सिंग, अक्षर पटेल आणि हार्दिक पंड्याने दोन -दोन विकेट घेतले.

IND vs ENG : अर्शदीप सिंगने रचला इतिहास, मोडला युजवेंद्र चहलचा ‘हा’ मोठा विक्रम

follow us
  • fb
  • instagram
  • youtube