Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा (Pradhan Mantri Awas Yojana) मोठा लाभ मिळणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अतिरिक्त 13 लाख घरे मुंजर करण्यात आली. एकूण या वर्षी केंद्र सरकारने गरिबांसाठी, बेघरांसाठी 20 लख घरे दिली, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
राहुल गांधींचा परभणी दौरा निव्वळ राजकीय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र
राहुल गांधी हे केवळ राजकीय हेतूने परभणीत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. राहुल गांधींच्या परभणी दौऱ्याविषयी विचारलं असता फडणवीस म्हणाले की, राहुल गांधी हे केवळ राजकीय हेतूने परभणीत आले होते. ही राजकीय भेट होती. लोकांमध्ये जाती जातीत भेद निर्माण करायचे ते गेली अनेक वर्ष काम करत आहे. त्यामुळं मला असं वाटतं की, त्यांचे जे विद्वेषाचे काम आहे, ते त्यांनी त्या ठिकाणी जाऊन केलं, अशी टीका फडणवीस यांनी केली.
प्रधानमंत्री आवास योजनेत 20 लाख नवीन घरे महाराष्ट्रासाठी मंजूर केल्याबद्दल मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहानजी यांचे अतिशय मनापासून आभार !@narendramodi @ChouhanShivraj#Maharashtra #PMAwasYojana pic.twitter.com/plIV72xQWg
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 23, 2024
‘मस्क’चा भारतीयांना झटका! एक्स प्रिमियम प्लान्सच्या दरात मोठी वाढ; आता ‘इतके’ पैसे मोजा
यावेळी बोलतांना फडणवीस यांनी पंतप्रधान आवास योजनेची माहिती दिली. ते म्हणाले की, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की, प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत या वर्षी आपल्याला केंद्र सरकारकडून साडे सहा लाख घरे मंजुर करण्यात आली होती. आता ते टार्गेट वाढवण्यात आले आहे. अतिरिक्त 13 लाख घरे आपल्याला देण्यात आली. एकूणच जवळपास या वर्षी केंद्र सरकारच्यावतीने गरिबांसाठी, बेघरांसाठी तसेच कच्च्या घरात राहणाऱ्यांसाठी एका वर्षात 20 लाख घरे देण्याची घोषणा केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी केली. महाराष्ट्राला मोदी सरकारने दिलेली ही अत्यंत मोठी भेट आहे, असं फडणवीस म्हणाले.
ते म्हणाले, देशाच्या इतिहासात कुठल्याच राज्यात एका वर्षात एवढी घरे मिळालेली नाहीत. या योजनेसाठी 26 लाख अर्ज आले होते. मात्र आता 20 लाख मंजूर झाले आहेत. उर्वरित अर्जदारांना पुढील वर्षी घरे देऊ. पूर्वी सर्वेक्षणात जे निकष होते, ते देखील सौम्य करण्यात आलेत. यासोबत आणखी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे की ज्यांची नावे सुटली होती, त्यांना नव्या सर्वेक्षणात घेण्यात येणार आहे. जे खरे बेघर आहेत, मग ते शेतकरी असो किंवा महिला असो अशा सगळ्यांना नव्या सर्वेक्षणात सर्वांना सामावून घेण्यात येणार आहे, यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.