‘मस्क’चा भारतीयांना झटका! एक्स प्रिमियम प्लान्सच्या दरात मोठी वाढ; आता ‘इतके’ पैसे मोजा

‘मस्क’चा भारतीयांना झटका! एक्स प्रिमियम प्लान्सच्या दरात मोठी वाढ; आता ‘इतके’ पैसे मोजा

Elon Musk : टेस्ला कंपनीचा मालक एलन मस्कची सोशल मिडिया कंपनी ‘एक्स’ने (आधीचे ट्विटर) प्रिमियम प्लान्सच्या दरात मोठी वाढ केली आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे जगभरातील एक्स युजर्सना मोठा धक्का बसला आहे. या निर्णयानुसार युजर्सना प्रिमियम प्लानसाठी 35 टक्के जास्त रक्कम मोजावी लागणार आहे. हा निर्णय 21 डिसेंबरपासूनच लागू करण्यात आला आहे. ज्या युजर्सने आधीच प्रिमियम प्लान घेतला असेल त्यांनी पुढील वेळी येणारे बिल नव्या रेटनुसार भरावे लागणार आहेत. चला तर मग जाणून घेऊ या काय आहे नेमका निर्णय..

डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीममध्ये VVIP एन्ट्री! एलन मस्क अन् ‘या’ भारतीयावर मोठी जबाबदारी

या निर्णयानुसार एक्स प्रिमियम प्लस युजर्सना प्रत्येक महिन्याला 1750 रुपये द्यावे लागणार आहेत. याआधी या यु्जर्सना 1300 रुपये द्यावे लागणार आहेत. या पद्धतीने दरवर्षी प्रिमियम प्लस प्लान्सचे दर वाढून 13600 रुपयांवरून 18300 रुपये इतके करण्यात आले आहेत. कंपनीने हा निर्णय का घेतला याची तीन कारणे एलन मस्कने (Elon Musk) दिली आहेत.

पहिलं कारण म्हणजे एक्स प्लॅटफॉर्मवर आता कोणतीही जाहीरात दाखवण्यात येणार नाही. दुसरे म्हणजे यातून कंटेंट तयार करणाऱ्या लोकांना जास्त पैसे मिळणार आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे या प्लॅटफॉर्ममध्ये नवनवीन फीचर्स जोडण्यात येणार आहेत. या तीन कारणांमुळे प्रीमियम प्लान्सच्या दरात वाढ करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या निर्णयाने एक्स युजर्सला मात्र मोठा झटका बसणार आहे.

कंपनीने म्हटले आहे की प्रिमियम प्लस युजर्सना अनेक फायदे मिळणार आहेत. त्यांना @Premium द्वारे त्वरित मदत मिळणार आहेत. ‘Radar’ या नवीन वैशिष्ट्याचा वापर करण्याची संधी युजर्सना मिळणार आहे. तसेच सर्वात उत्कृष्ट एआय मॉडेल्सचा देखील वापर करता येईल. आम्ही प्लान्सच्या दरात वाढ केली आहे जेणेकरून प्रिमियम प्लसला आणखी दर्जेदार बनवता येईल.
अर्रर्र! इंस्टाग्राम ॲप डाउन? सर्व्हर, लॉगिनच्या समस्या..नेटिझन्सने X वर पोस्ट करत तक्रारी नोंदवल्या

तुम्ही जेव्हा सब्सस्क्रिप्शन घेता त्यांच्या पैशांचा फायदा कंपनीच्या कंटेंट क्रिएटर्सना होतो. आम्ही पैसे वाटपाची पद्धत बदलली आहे. आता जाहिराती किती वेळा पाहिल्या गेल्या आहेत याचाच फक्त विचार केला जाणार नाही तर कंटेंट लोकांच्या किती पसंतीस उतरत आहे याचाही विचार केला जाणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube