डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीममध्ये VVIP एन्ट्री! एलन मस्क अन् ‘या’ भारतीयावर मोठी जबाबदारी
Donald Trump News : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प निवडले (Donald Trump) गेले आहेत. यानंतर त्यांनी कामाला सुरुवात केली आहे. आधीच्या डेमोक्रॅटिक सरकारने घेतलेले अनेक निर्णय पलटवण्याचं काम त्यांनी हाती घेतलं आहे. तसेच नव्या निर्णयांचा धडाकाच लावला आहे. आताही त्यांनी सर्वांना अचंबित करणारा निर्णय घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प येत्या 20 जानेवारी रोजी राष्ट्रपती पदाची शपथ घेतील. परंतु, काही महत्वाचे निर्णय घेण्यास त्यांनी आतापासूनच सुरुवात केली आहे. जगातील सर्वाधिक श्रीमंत आणि टेस्ला इलेक्ट्रिक कार कंपनीचा मालक एलन मस्क आणि अमेरिकेतील प्रभावशाली व्यक्ती विवेक रामास्वामी यांना डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियंसीची जबाबदारी देण्यात आली आहे.
मोठी बातमी! आता अमेरिकेत ट्रम्प सरकार; डोनाल्ड ट्रम्प यांनी गाठलं बहुमत
डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियंसीचा मुख्य उद्देश सरकारी कामकाजात सुधारणा, नोकरशाहीत कपात आणि यंत्रणांच्या संरचनेत बदल करणे हा आहे. ट्रम्प यांच्या माहितीनुसार हा विभाग आता सरकारी साधनांचा दुरुपयोग रोखण्यासाठी, अनावश्यक खर्चात कपात करण्यासाठी आणि अनावश्यक नियमांत सुधारणा करण्यासाठी काम करेल. ट्रम्प यांनी याला सेव अमेरिका मूव्हमेंटचा एक भाग असल्याचं सांगितलं होतं. आता या विभागात एलन मस्क (Elon Musk) आणि विवेक रामास्वामी यांनी महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. मस्क या विभागात टेक्नॉलॉजी आणि प्रौद्योगिकी आधारीत सुधारणांवर काम करणार आहे. तर भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी (Vivek Ramaswamy) सरकारी खर्चात कपात आणि यंत्रणांच्या पुनर्गठणावर भर देणार आहेत.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत यंदा (US Elections 2024) रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना बहुमत मिळालं. तर डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस (Kamala Harris) यांचा पराभव झाला. अमेरिकेत ५० राज्ये आहेत. यामध्ये बहुतांश राज्ये प्रत्येक निवडणुकीत एकाच पक्षाला मतदान करत आले आहेत. निवडणुकीत महत्वाचे मानले जाणाऱ्या सात स्विंग स्टेटमधील मतदारांचा कल बदलता असतो. लोकसंख्येच्या आधारावर राज्यांना निर्वाचक मंडळ मते दिली जातात. एकूण ५३८ इलेक्टोरल कॉलेजसाठी मतदान होते. २७० किंवा त्यापेक्षा जास्त इलेक्टोरल कॉलेज मते मिळवणाऱ्या उमेदवाराला विजयी घोषित केले जाते.
अमेरिकेतील हिंदूंचा डोनाल्ड ट्रम्पला पाठिंबा, म्हणाले, कमला हॅरिस निवडून आल्यास भारत-अमेरिका संबंध