Download App

Video : शरद पवारही ‘जय कर्नाटक’ म्हणाले होते; शिंदेंची पाठराखण करताना फडणवीसांचा दाखला

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात म्हटलं. त्यावर बोलताना, मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यावर उत्तर दिली आहेत.

CM Fadnavis on Jai Gujarat Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात म्हटलं, म्हणाजे शिंदे यांच गुजरातवर प्रेम व महाराष्ट्रावर प्रेम नाही असं होत नाही. शरद पवारांनीही अशी एकदा कर्नाटकच्या लोकांमध्ये घोषणा दिली होती. (Shinde ) त्यामुळं इतका संकुचीत विचरा कुणी करत असेल तर ते चुकीच आहे. आता विरोधकांना मुद्दे नाही असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांची पाठराखन करून विरोधकांना सुनावलं आहे.

Video : ठाकरेंच्या विजयी मेळाव्यापूर्वी शिंदेंनी पेटवला नवा वाद; पुण्यात शाहंसमोर जय गुजरातची घोषणा

फडणवीस नक्की काय म्हणाले?

यापूर्वी एकदा चिकोडी येथे बोलताना, शरद पवार यांनी जय महाराष्ट्र आणि जय कर्नाटक असं म्हटलं होतं. याचा अर्थ त्यांचं कर्नाटकवर जास्त प्रेम आहे आणि महाराष्ट्रावर प्रेम नाही असं समजायचं का? असं आहे, आपण ज्यांच्या कार्यक्रमात जातो, त्या संदर्भात आपण बोलत असतो. आता गुजराती समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर जय गुजरात म्हटलं, म्हणजे एकनाथ शिंदे यांचं गुजरातवर प्रेम वाढलं आणि मराठीवरचं प्रेम कमी झालं, महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं, इतका संकुचित विचार मराठी मणसाला शोभत नाही, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मराठी माणूस हा वैश्विक आहे. याच मराठी माणसाने अटकेपार झेंडा नेला आहे. याच मराठी माणसाने संपूर्ण भारताला स्वतंत्र केलं आहे. याच मराठी माणसानं मोगली सत्ता घालवण्याचं काम केलं आहे, त्यामुळे एवढा संकुचीत विचार कोणी या ठिकाणी करत असेल तर ते चुकीचं आहे, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. विरोधकांकडे आता मुद्देच राहिलेले नाहीत, त्यांचा लोकांशी टचच राहिलेला नाही. लोकांच्या मनात काय हे देखील त्यांना माहीत नाही, आणि म्हणूनच ते असे मुद्दे उचलत आहेत असंही यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.

 

 

follow us