Video : हजार माराव्या अन्…; शिंदेंच्या ‘जय गुजरात’ नंतर राऊतांंसह ठाकरेंच्या वाघिणींनी सोडला ‘बाण’

  • Written By: Published:
Video : हजार माराव्या अन्…; शिंदेंच्या ‘जय गुजरात’ नंतर राऊतांंसह ठाकरेंच्या वाघिणींनी सोडला ‘बाण’

Sanjay Raut On Eknath Shinde Jay Gujrat :  पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात अशी घोषणा दिली. त्यांच्या या घोषणेनंतर आता राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली असून, ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) शिंदेंना हजार माराव्या आणि एक मोजाव्या असे म्हणत सुनावले आहे. राऊतांनी एक्सवर शिंदेंच्या जय गुजरात गर्जनेचा व्हिडिओ जोत एक पोस्ट केली आहे.

कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट ; बलात्कार करणारा ‘डिलिव्हरी बॉय’ पिडीत महिलेचा जुना मित्र?

राऊतांनी काय सुनावलं?

राऊतांनी त्यांच्या एक्सवरील पोस्टमध्ये शिंदेंच्या भाषणाचा व्हिडिओ जोडला आहे. त्यावर दिलेल्या कॅप्शनमध्ये राऊत म्हणतात की,  अमित शहा यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचे खरे रूप आज बाहेर आले! पुण्यात या महाशयांनी अमित शहा समोर “जय गुजरात “ ची गर्जना केली! काय करायचे? ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजारा हजार माराव्या आणि एक मोजाव्या हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? असा सवाल राऊतांनी केला असून, यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे.

ठाकरेंच्या वाघीणींचीही डरकाळी

शिंदे यांच्या जय गुजरात घोषणेवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं हल्ला चढवला आहे. ‘बाळासाहेबांच्या विचारावर चालत असल्याचं शिंदे शिवसेनेतून बाहेर पडताना म्हणाले. जय गुजरात हे बाळासाहेबांचे विचार कधीपासून झाले,’ असा सवाल शिवसेना उबाठाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी विचारला आहे. शिंदेंनी दिलेल्या जय गुजरात घोषणेची फडणवीसांनी गांभीर्यानं दखल घ्यावी. कारण ते संपूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते राज्याचं नेतृत्व करतात, असं पेडणेकर म्हणाल्या.

Video : बाजीराव पेशवेंच्या स्मारकासाठी पुण्यातील एनडीएच योग्य; अमित शाहांचं शिक्कामोर्तब

शाहंसाठी शिंदेंनी ऐकवाल शेर

अमित शाह यांच्यासाठी शिंदे यांनी एक शेर ऐकविला. ”आपके बुलंद इरादोंसे तो चट्टाने भी डगमगाती है, दुश्मन क्या चीज है, तुफान भी अपना रुख बदल देता है, आपके आने से यहाँ की हवा का रुख बदल जाता है, आपके आनेसे हर शख्स आदब से झुक जाता है”, असा हा शेर शिंदे यांनी ऐकवला.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube