Devendra Fadnavis : पुढच्या दोन वर्षात 1 लाख 20 हजार सरकारी नोकऱ्या देणार, CM देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Devendra Fadnavis : पुढच्या तीन वर्षात 1 लाख 20 हजार सरकारी नोकऱ्या देणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

Devendra Fadnavis Photo

Devendra Fadnavis Photo

Devendra Fadnavis : पुढच्या तीन वर्षात 1 लाख 20 हजार सरकारी नोकऱ्या देणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना केली आहे. महायुती सरकारने 3 वर्षात 1 लाख 20 हजार सरकारी नोकऱ्या दिल्या असून पुढच्या दोन वर्षात आणखी 1 लाख 20 हजार नोकऱ्या देणार असं अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, महायुती सरकारने गेल्या दोन वर्षात 1 लाख 20 हजार सरकारी नोकऱ्या (Government jobs) दिल्या आहेत आणि पुढील दोन वर्षात आणखी 1 लाख 20 हजार सरकारी नोकऱ्या देणार आहोत. तसेच अंतिम आठवडा प्रस्तावला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यात सुरु असणाऱ्या कोणतीही योजना बंद होणार नसल्याची ग्वाही देखील दिली.

7 डिसेंबरपासून सुरु झालेल्या राज्याच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी बेरोजगारी, शिक्षण आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला होता मात्र अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्लाबोल करत प्रत्युत्तर दिले आहे.  यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यात सुरु असणाऱ्या योजना बंद होणार नाही. तसेच मुंबई चंद्र आणि सूर्यं असेपर्यंत महाराष्ट्राचीच राहणार आहे.

महाराष्ट्रावरच्या वाढत्या कर्जाची चिंता नको

तर यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या अर्थव्यवस्थेवर देखील भाष्य करत महाराष्ट्रावरच्या वाढत्या कर्जाची चिंता नको असं म्हटले आहे. तसेच भांडवली गुंतवणूक महाराष्ट्राने कमी केली नाही. आम्ही महाराष्ट्राचं व्हिजन डॉक्युमेंट तयार केलंय आहे त्यामुळे आता महाराष्ट्र थांबणार नाही. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सर्व निकषात बसणारी आहे असं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर मराठवाडा आणि विदर्भात मोठी गुंतवणूक होत आहे. 15 लाख 72 कोटींपैकी 5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक विदर्भात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

गेल्या वर्षात राज्यात 1 लाख 75 हजार कोटींची गुंतवणूक आली असून कृषी क्षेत्रात मराठवाड्यात 2 हजार 500 कोटींची गुंतवणूक आली आहे. मिहानमध्ये 31 कंपन्या कार्यरत आणि 22 नवीन कंपन्या सुरू होत आहेत. देशातील आयटी क्षेत्रातील बिग सिक्स सहाच्या सहाही मिहानमध्ये आहेत.
1 लाख 27 हजार 225 लोकांना रोजगार मिळालेला आहे. विणतात झाल्याने अजून रोजगार वाढेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील विद्यार्थ्यांना सरकार रोजगार देणार का? विजय वडेट्टीवारांचा सवाल 

Exit mobile version