Download App

कबुतरखाना विषय वादाचा नाही, समाजाचा आहे; मु्ख्यमंत्री फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट

Devendra Fadnavis On Pigeon House :  राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कबुतरखाना प्रकरणावरुन राजकारण तापले

  • Written By: Last Updated:

Devendra Fadnavis On Pigeon House :  राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कबुतरखाना (Pigeon House) प्रकरणावरुन राजकारण तापलं असताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून (Devendra Fadnavis) या प्रकरणात भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. कबुतरखाना विषय वादाचा नाही, समाजाचा आहे असं माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच आरोग्याचं रक्षण होणं देखील महत्वाचं आहे. या प्रकरणात योग्य मार्ग काढण्याचे प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया देखील माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हा विषय वादाचा नाही, समाजाचा आहे. लोकांच्या आरोग्यासोबत आस्थाही महत्वाची आहे. त्यामुळे आम्ही आरोग्य आणि समाजाची आस्था यांचा विचार करुन योग्य मार्ग काढण्याचा प्रयत्न करु असं माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ऑलिंपिक पदक विजेता सुशील कुमारला मोठा झटका, ‘त्या’ प्रकरणात आत्मसमर्पण करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

तसेच मांसबंदीबाबत राज्य सरकारने कुठलाही निर्णय घेतलेला नाही. 1988 पासून हा निर्णय लागू आहे. 1988 मध्ये यासाठी जीआर काढण्यात आला आहे.
कुणी काय खावं हे ठरवण्यात सरकारला काही इंनरेस्ट नाही. आमच्या सरकारने हा निर्णय घेतलेला नाही. असं देखील यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ध्वाजारोहणास छगन भुजबळांचा नकार अन् मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; महायुतीत नाराजीनाट्य? 

तर दुसरीकडे कबुतरखान्यांवरील बंदी कायम ठेवण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने घेतला आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिल्यानंतर कबुतरखान्यांवरील बंदी हठवण्यात यावी या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

follow us