Devendra Fadnavis : महाराष्ट्रात महायुतीचं (Mahayuti) सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) झपाट्याने कामाला लागले आहेत. खातेवाटप झाल्यानंतर त्यांनी आपल्या पक्षातील मंत्र्यांनाही कामाला लावले. त्यांनी आता दर आठवड्याला मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेण्यास सुरूवात केली. त्याचाच भाग म्हणून आज फडणवीसांनी मंत्र्याचा क्लास घेतला. तसेच मंत्र्याच्या कामाचे आठवड्याचे वेळापत्रकही ठरवले. भाजप मंत्र्यांचे दर 15 दिवसांनी रिपोर्ट कार्ड (Report Card) तयार करण्यात येणार आहे, अशीही माहिती आहे.
गुंड थोडेच संप्रादाय चालवतात? मुंडेंना महंतांकडून क्लिनचीट…जरांगेंची सटकली
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्रिमंडळातील भाजपच्या सर्व मंत्र्यांची आज मुंबईत बैठक घेतली. या बैठकीत फडणवीसांनी काही महत्वाचे निर्णय घेतले. सोमवार ते बुधवारी मुंबईमध्ये राहण्याचे आदेश दिले. मंत्री हे एका खात्याचे मंत्री असेल तरी ते त्यांच्या मतदारसंघाचेही प्रतिनिधी आहेत. त्यामुळे त्यांना आपल्या मतदारसंघाचीदेखील कामे करणं अनिवार्य आहे. मात्र, राज्यातील विकासकामांकडेही लक्ष द्यावं. त्यासाठी फडणवीसांनी मंत्र्याचं कामकाजाचं वेळापत्रक ठरवलं.
मंत्र्याचं कामकाजाचे वेळापत्रक
भापज मंत्री सोमवार ते बुधवार मुंबईमध्ये असणार
मंत्री गुरुवारी आणि शुक्रवारी राज्यभरात विभागाच्या कामाचा आढावा घेतील.
मंत्री शनिवारी आणि रविवारी आपल्या मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावणार.
फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना या संदर्भात आदेश देखील दिलेत. प्रत्येक विभागात सुरू असणाऱ्या सुनावण्या प्रलंबित न ठेवता पूर्ण करा. त्यासाठी विशेष वेळ द्या, अशा सुचनाही त्यांनी दिल्या. त्यामुळं येणाऱ्या काळात मंत्र्यांना अधिक वेळ काम करून सुनावण्या पूर्ण कराव्या लागणार आहेत.
Sonali Kulkarni :नाद खुळा! काळ्या स्कर्ट-टॉपमध्ये सोनालीचा स्टायलिश अंदाज
सरकार आणि संघटना यांच्यात समन्वय
सरकार मार्फत कामे करतांना भाजपची संघटना मजुबतीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मंत्र्यांची दर पंधरवाड्याला आढावा बैठक होणार आहे. मंत्र्यांनी संघटनेमार्फत आलेली किती लोकोपयोगी कामे मार्गी लावली? त्याचा आढावा घेणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यासोबत दर तीन महिन्यांनी भाजप मंत्री आणि पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण त्यात आढावा घेणार आहेत.
भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, मुंबईत पक्षाची चांगली सदस्यता नोंदणी झाली आहे. मात्र, काही ड्राय भाग राहिला आहे. तिथं देखील सदस्यता नोंदणी झाली पाहिजे, असा आग्रह आहे. 19 तारखेपर्यंत सदस्यता नोंदणी पू्र्ण करायची आहे. सोबतच सक्रीय नोंदणी देखील करायची आहे. एकत्रित दोन्ही सदस्यता नोंदणी व्हावी, असा आग्रह आहे.
पीएम नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष जेपी नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून बुथवर जाऊन सदस्यता नोंदणीचे आवाहन केलं जातंय. महाराष्ट्रात दीड कोडी सदस्य नोंदणीचे टार्गेट आम्हाला देण्यात आलं. हे लक्ष साध्य करण्यासाठी आज पक्षाचे पदाधिकारी, युवा मोर्चा व इतर पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक बोलावली होती, असं चव्हाण यांनी सांगितलं.