Assembly Session : अजित पवारांचं सरकारमध्ये येणं म्हणजे बूस्टर डोस, मुख्यमंत्री शिंदेंची टोलेबाजी…

Assembly Session : अजित पवार सरकारमध्ये येणं म्हणजे बूस्टर डोसच असल्याचं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार टोलेबाजी केलीयं. दरम्यान, विधानसभेचं अधिवेशन सुरु आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका-टीपण्यांचं सत्र सुरुच आहे. त्यावरुन अनेक नेत्यांमध्ये खडाजंगी सुरु असल्याचं दिसून येत आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपल्या निवदेनात विरोधकांवर निशाणा साधला आहे. भीमा कोरेगावप्रकरणी पाच […]

Cm Eknath Shinde Assembly

Cm Eknath Shinde Assembly

Assembly Session : अजित पवार सरकारमध्ये येणं म्हणजे बूस्टर डोसच असल्याचं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार टोलेबाजी केलीयं. दरम्यान, विधानसभेचं अधिवेशन सुरु आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका-टीपण्यांचं सत्र सुरुच आहे. त्यावरुन अनेक नेत्यांमध्ये खडाजंगी सुरु असल्याचं दिसून येत आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपल्या निवदेनात विरोधकांवर निशाणा साधला आहे.

भीमा कोरेगावप्रकरणी पाच वर्षानंतर गोन्साल्विस आणि फेरेरिया तुरुंगाबाहेर, सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अजित पवार यांनी आमचं डबल इंजिन सरकारचं काम पाहुन सत्तेत सामिल झाले आहेत. अजितदादा सरकारमध्ये आले म्हणजे आता बुस्टर डोस असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवरुन टीका केली आहे. सामनाचे संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीतून उद्धव ठाकरेंनी शिवसेनेतून बंड केलेल्या आमदारांवर जोरदार टीका केल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर आज विधानसभेत मुख्यंत्र्यांनीही ठाकरेंचा समाचार घेतला आहे. ते म्हणाले, आमचं सरकार वर्क फ्रॉम होम नाही, असा खोचक टोला त्यांनी ठाकरेंना लगावला आहे.

पाकिस्तानवर उपासमारीची वेळ, ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये 99व्या क्रमांकावर घसरण

महाविकास आघाडी सरकारने देवेंद्र फडणवीस यांनी सुरु केलेली कामे थांबवली होती. आम्ही सत्तेत आल्यानंतर ती कामे सुरु केली आहेत. त्यावेळी मीदेखील महाविकास आघाडीमध्ये होतो, हेही त्यांनी कबूल केलं आहे. याचदरम्यान, जयंत पाटलांना उद्देशून त्यांनी ‘जे आहे ते मान्य करा जयंतराव’असंही म्हणाले आहेत.

दरम्यान, आम्ही कामं करतो दोष देण्यात वेळ वाया घालवत नसून विरोधकांनी जनतेला दिलेली आश्वासनेही आम्हीच पूर्ण करत असल्याचा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी लगावला आहे.

Exit mobile version