महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सोडवण्यासाठी योगी स्वत: सरसावले…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नूकताच अयोध्या दौरा संपन्न झाला आहे. यादौऱ्यादरम्यान, मुख्यमंत्री शिंदेंनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही भेट घेतली आहे. विशेष म्हणजे या भेटीनंतर मुख्यमंत्री योगी स्वत: मुख्यमंत्री शिंदेंना कारपर्यंत सोडवण्यासाठी थेट गेटपर्यंत आल्याचं दिसून आलं. अकोल्यातील पारस गावातील मंदिराच्या टिन शेडवर झाड कोसळल्याने 7 भाविकांचा मृत्यू मुख्यमंत्री शिंदेंनी अयोध्या दौऱ्यात श्रीरामाचं दर्शन […]

Cm Eknath Shinde

Cm Eknath Shinde

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नूकताच अयोध्या दौरा संपन्न झाला आहे. यादौऱ्यादरम्यान, मुख्यमंत्री शिंदेंनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही भेट घेतली आहे. विशेष म्हणजे या भेटीनंतर मुख्यमंत्री योगी स्वत: मुख्यमंत्री शिंदेंना कारपर्यंत सोडवण्यासाठी थेट गेटपर्यंत आल्याचं दिसून आलं.

अकोल्यातील पारस गावातील मंदिराच्या टिन शेडवर झाड कोसळल्याने 7 भाविकांचा मृत्यू

मुख्यमंत्री शिंदेंनी अयोध्या दौऱ्यात श्रीरामाचं दर्शन घेतलं आहे. त्यानंतर अयोध्येतल्या हनुमान गढी इथं छोटेखानी त्यांची सभाही पार पडली. या सभेत मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

दरम्यान, यावेळी उपमुख्यमंत्रीही देवेंद्र फडणवीस हेही सोबत होते. फडणवीसांनी पुन्हा माघारी परतायचे असल्याने फडणवीस कालच महाराष्ट्राकडे रवाना झाले आहेत.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना त्रास देण्यासाठी पोलिसांचा वापर; आव्हाडांची टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योगी आदित्यनाथ यांच्याकडे अयोध्येत महाराष्ट्र उभारण्यासाठी जागेची मागणी केल्याचं मुख्यमंमत्र्यांनी स्पष्ट केलंय. तर या मागणीला योगी आदित्यनाथ यांनी मागणील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

दिल्ली, मुंबई, कोलकाता, पाटणा यासह तुमच्या शहरात 10 एप्रिलला सेहरी-इफ्तारच्या वेळा जाणून घ्या…

शिंदे आणि योगी यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती समोर झाली आहे. नेमकी काय चर्चा झाली? याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यात शिंदे-फडणवीस सरकारचे आमदार, खासदार, मंत्री, कार्यकर्तेही गेले होते. योगी यांच्याशी भेट घेताना मुख्यमंत्र्यासमवेत मंत्री दादा भुसे, रामदास कदम, गिरिष महाजन, यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. दरम्यान, या भेटीनंतर योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सोडवण्यासाठी थेट गेटपर्यंत आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

Exit mobile version