Download App

आम्ही शेतकऱ्यांचे अश्रू पुसले, तुम्ही पानं…; CM शिंदेंनी टीका करत वाचली सरकारच्या कामांची यादी

  • Written By: Last Updated:

Eknath Shinde : शेतकरी (Farmer) प्रश्नावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget 2024) विरोधकांनी केलेल्या टीकेला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) जोरदार प्रत्युत्तर दिलं. विरोधकांना शेतकऱ्यांशी काही देणेघेणे नाही. आम्ही शेतकऱ्यांचे अश्रू पुसले, तुम्ही तोंडाला पाने पुसली, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी कोणत्या योजना सुरू केल्याच, याची यादीच वाचून दाखवली.

डिनर डिप्लोमसीवर शरद पवार ‘हिट विकेट’; CM शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आग्रहाचं निमंत्रण नाकारलं 

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सर्व बाजूंनी टीका होत असताना सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. तुम्ही 50 हजार रुपये दिले नाहीत, आम्ही पैसे खात्यात जमा केले, तुम्ही फक्त पोकळ घोषणा केल्या, आमचं काम भरीव आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

ते म्हणाले, शेतकरी शेतात काम करतो म्हणून आपल्याला अन्न मिळते हे आपण मान्य केलं पाहिजे. सरकार म्हणून आम्ही शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर योजना राबवल्या आहेत. केंद्र सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत 16 आठवड्यांत 29,520 कोटी रुपये बँकेत जमा करण्यात आले. याच धर्तीवर राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली. केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना वर्षाला 12 हजार रुपये मिळतात. पहिल्या तिमाहीत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 1720 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 3800 कोटी रुपये जमा झाले. याचा 88 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ झाला, असं शिंदे म्हणाले.

Akshay Kumar भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवणार? सर्वत्र चर्चांना उधाण 

दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी म्हणाले होते की, केंद्र सरकारने 1 रुपये मंजूर केल्यास केवळ 15 पैसेच लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतात. पण आता संपूर्ण रुपया 1 लाभार्थ्यांकडे जातो. आम्ही 35 हजार कोटींची शेतकऱ्यांना मदत केली. तुमचे सरकार असते आणि 35 हजार कोटी रुपये आले असते चक 30 हजार कोटी रुपये हडप झाले असते, अशी टीका शिंदे यांनी विरोधकांवर केली. पण आता आमचे सरकार आहे. डबल इंजिन सरकारमुळे शेतकऱ्यांना दुहेरी लाभ आणि दुहेरी आनंद मिळत आहे.

अवकाळी पाऊस आणि गारपीट अशा अस्मानी संकटाममुळं अडचणीत सापडलेल्या बळीराजाला आपल्या सरकारने विक्रमी मदत दिली आहे. गेल्या दोन वर्षांत सरकारने शेतकऱ्यांना 15,212 कोटी रुपयांची मदत दिली आहे, असंही शिंदे म्हणाले.

ते म्हणाले, आम्ही वशिष्ठ नदीतून समुद्रात वाहणाऱ्या 65 टीएमसी पाण्याचा विचार केला आहे. कोकणात बॅकलॉक दूर काढण्यासाठी काम सुरू केलं. लहान व मध्यम बंधार बांधून कोकण समृद्ध करण्याचे काम ते करत आहोत. मराठवाडा वॉटर ग्रीड महाविकास आघाडीने बासनात गुंडाळला. तो आम्ही सुरू केला.

कर्जमुक्ती योजनेंतर्गत 5190 कोटी रुपये वितरित
महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत 5190 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. या योजनेचे 99.5 टक्के काम पूर्ण झाल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.

follow us