मुंबई : मी आधीच डॉक्टर झालेलो आहे, त्यामुळे मी छोटीमोठी ऑपरेशन करीत असल्याची फटकेबाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. नवी मुंबईतील डी.वाय. पाटील विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होतेय यावेळी त्यांनी तुफान फटकेबाजी केली आहे.
Sanjay Shirsat यांचा ठाकरेंना इशारा… तर तुम्हाला कपडे काढून फिरायला लावेन!
यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कार्यक्रमासाठी आलो असताना मला विजय पाटील म्हणाले एकनाथ शिंदे आता डॉक्टर होणार आहेत. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले मी आधीच डॉक्टर झालो आहे छोटीमोठी ऑपरेशन मी करीत असतो, असं म्हणत त्यांनी तुफान फटकेबाजी केलीय. तसेच माझा मुलगा याच महाविद्यालयात डॉक्टर झाला आहे. आज त्याचं महाविद्यालयाने मला आज डी. लिट. पदवी प्रदान केली याचा मला आनंद होत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.
तसेच समाजात काम करीत असताना 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण हा बाळासाहेबांचा मूलमंत्र असून मी अद्यापही कार्यकर्ता म्हणूनच काम करीत आहे. आपल्या शक्तीचा वापर सर्वसामान्य नागरिकांसाठी करत असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे.
Marriage : भाच्याच्या लग्नात मामा कुबेर, सोनं, चांदी, जमीन देत केला आठ कोटींचा खर्च
समाजात काम करीत असताना माणसाने त्याच्या मागचा काळही आठवावा. आज माझा संपूर्ण परिवार समारंभात उपस्थित असून काही कारणांमुळे तसेच कौटुंबिक जबाबदारीमुळे मी माझं शिक्षण पूर्ण करु शकलो नाही मात्र, गेल्या तीन वर्षांपूर्वीच मी बीए डिग्री घेतल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह निरुपणकार सचिन धर्माधिकारी यांना डी. लिट पदवी प्रदान करण्यात आलीय. या समारंभात केंद्र सरकारसह राज्यातील अनेक मंत्री तसेच हजारोंच्या संख्येने श्रीसेवक आवर्जून उपस्थित होते.