Marriage : भाच्याच्या लग्नात मामा कुबेर, सोनं, चांदी, जमीन देत केला आठ कोटींचा खर्च
नागौर : राजस्थानमध्ये बहिनीच्या मुलांच्या म्हणजे भाची आणि भाच्याच्या लग्नामध्ये बहिनीला विविध वस्तू, कपडे, दाग-दागिने, रोख रक्कम देण्याची प्रथा आहे. या प्रथेला ‘मायरा भरना’ असं म्हटलं जात. त्यामुळे राजस्थानातील अनेक लोक आपल्या बहिनीच्या मुलांच्या लग्नात मायरा भरन्यासाठी कोट्यवधी रूपयांचा खर्च करतात. असाच एका मामाने आपल्या भाचीच्या लग्नात थेट तीन कोटी रूपये खर्च केल्याची बातमी खूप व्हायरल झाली आहे.
त्यानंतर आता आणखी एका मामाने या तीन कोटींचा खर्च करणाऱ्या मामाचं रेकॉर्ड तोडत तब्बल आठ कोटींचा खर्च केला आहे. आपल्या बहिनीच्या मुलाच्या लग्नात एवढा मोठा खर्च करणारा हा मामा राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील ढींगसरा या गावचा आहे. येथील सहा भावांनी मिळून गावापासून 30 किमी अंतरावर शिवपूरा गावात राहणाऱ्या आपल्या बहिनीच्या मुलाच्या लग्नात मायरा भरन्यासाठी मोठा खर्च केला. याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत.
‘उमेश पाल अपहरण’ प्रकरणात अतिक अहमदला दोषी ठरवणारे न्यायाधीश कोण?
मेहरिया असं या मायरा भरणाऱ्या मामांचं आडनाव आहे. या सहा भावांनी आपली एकुलती एक बहिण भंवरी देवीच्या मुलाच्या लग्नात मोठा खर्च केला आहे. यामध्ये त्यांनी 2.21 कोटी रोख रक्कम, 1 किलो सोन, 14 किलो चांदी, 100 बीघा जमीन दिली आहे. तसेच गव्हाने भरलेला एक ट्रॅक्टर-ट्रॉली दिली. या मायऱ्यामध्ये 5 हजार लोक होते. यातील लोकांना 1-1 चांदीचं नाणं देण्यात आलं. यासाठी आलेल्या गाड्या पाच किमीपर्यंत होत्या. सगळे भाऊ रोख रकमेच्या थाळ्या घेऊन आले. तेव्हा गावातील लोक चकित झाले.