Download App

Chandrayaan 3 चे यश हा देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

  • Written By: Last Updated:

Chandrayaan 3 : भारताचे महत्त्वाकांक्षी चांद्रयान-३ (Chandrayaan 3)चे लँडर आज चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरले. चांद्रयान-३ चे चंद्रावर यशस्वी लँडिंग झाल्यानंतर देशभरात मोठा जल्लोष सुरू झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. आज भारत महासत्तेकडे वाटचाल करत आहे, त्यामुळं चंद्रयानानाचे यश हे देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा ठरले आहे. या माहिमेमुळं भारताचे अवकाश संशोधनातील श्रेष्ठत्व पुन्हा एकदा सिध्द झालं, अशी प्रतिक्रिया दिली.

इस्त्रोच्या कमांड सेंटरमधून सुरू असलेले प्रेक्षपण मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थानी पाहिले. मुख्यमंत्र्यांसह उपस्थित सर्वांनी टाळ्या वाजवून ही फत्ते झाल्याबद्दल आनंद साजरा केला. यावेळी उपस्थितांना पेढेहदी वाटण्यात आले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आज प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला असा हा आजचा क्षण आहे. चांद्रयानच्या या यशाने सर्व भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला आहे. देशातील सर्व शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि संशोधकांचे हे यश आहे. जगाचे भारताकडे लक्ष होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात्मक नेतृत्वाची आणि पाठबळाची ताकद शास्त्रज्ञांच्या पाठीशी आहे. श्रीहरी कोटा येथून 14 जुलैला चांद्रयान 3 चंद्राच्या दिशेने झेपावलं. अनेक कठीण टप्पे त्याने यशस्वीपणे पार केले. चांद्रयान 3 ने वेळोवेळी पाठवलेली छायाचित्रे आणि यानाची सकारात्मक प्रगती ही आजच्या या यशाची ग्वाही देत होते, असं शिंदे म्हणाले.

Welcome 3 Anil Kapoor : ‘या’ कराणामुळे अनिल कपूर वेलकम 3 मध्ये नसणार 

शिंदे म्हणाले की, भारतीयांना असलेली यशाची खात्री आणि शास्त्रज्ञांचे कर्तृत्वावर आणि त्यांच्या बुद्धिमत्तेवरील अढळ विश्वास आज फलदायी ठरला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही यावर प्रतिक्रिया दिली. मी ब्रिक्समध्ये आहे. पण आता प्रत्येक भारतीयाप्रमाणे माझे मनही चांद्रयान-३ मध्ये अडकले आहे. मी खूप आनंदी आहे. देशवासियांसोबत आनंदोत्सव साजरा करण्यास उत्सुक आहे. मी इस्रो आणि देशातील सर्व शास्त्रज्ञांना माझ्या शुभेच्छा देतो. ज्यांनी गेल्या काही वर्षात खूप मेहनत घेतली आहे. त्यांचे आभार मानतो. 140 कोटी जनतेला कोटी कोटी धन्यवाद, असं मोदी म्हणाले.

Tags

follow us