Independence day 2025 PM Narendra Modi Speech : देशाच्या 79 व्या स्वातंत्र्यदिनी (Independance Day 2025) आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित केले. लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावल्यानंतर पीएम मोदींनी भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा (Pahalgam Terror Attack) उल्लेख करून त्यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला.
मोदी म्हणाले, पहलगाममध्ये अतिरेक्यांनी लोकांना त्यांचा धर्म विचारून मारलं. त्यानंतर भारतीय सैन्याचे ऑपरेशन सिंदूर म्हणजे देशाच्या संतापाची अभिव्यक्ती होती. सैन्याला आम्ही पूर्ण मुभा दिली होती. त्यामुळे या मोहिमेत टार्गेट त्यांनीच निवडलं आणि कारवाई देखील केली. पाकिस्तानात काय नुकसान झालं याच्या बात्म्या रोजच येत असतात. भारतीय सैन्याच्या (Indian Army) या मोहिमेत पाकिस्तानचं प्रचंड नुकसान झालं.
आज आपल्याला लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून ऑपरेशन सिंदूरच्या (Operation Sindoor) शूर सैनिकांना सलाम करण्याची संधी मिळाली आहे. आपल्या शूर सैनिकांनी शत्रूंनाा त्यांच्या कल्पनेपलीकडे जाऊन शिक्षा दिली आहे. अण्वस्त्रांच्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही. सिंधू पाणीवाटप करार हा अतिशय अन्यायकारक होता असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला ठणकावून सांगितले.
त्यांनी धर्म विचारून भारतीयांना मारलं अन् आम्ही..पहलगाम हल्ल्यावरून राजनाथ सिंह काय म्हणाले?
आम्हाला कोणतीच रेष लहान करायची नाही. यात ऊर्जा वाया घालवायची नाही. तर आपली रेष आणखी मोठी करायची आहे. जर असं घडलं तर जगात देशाची ताकद आणखी वाढेल. आज जगात स्पर्धा वाढत आहे. आर्थिक स्वार्थ वाढतोय अशा संकटाच्या काळात हिंमतीने वाटचाल करण्याची गरज आहे. जर हा मार्ग आपण निवडला तर मग कोणताही स्वार्थ आपल्याला फसवू शकत नाही असे पीएम मोदी यांनी स्पष्ट केले.