त्यांनी धर्म विचारून भारतीयांना मारलं अन् आम्ही….पहलगाम हल्ल्यावरून राजनाथ सिंह काय म्हणाले?

Union Minister Rajnath Singh on Pahalgam : मध्य प्रदेशातील रायसेन येथे एका कार्यक्रमात (Pahalgam) केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह बोलत होते. त्यावेळी त्यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला. पहलगाम हल्ल्याचा संदर्भ देत ते म्हणाले की, दहशतवाद्यांनी भारतात लोकांना त्यांचा धर्म विचारून मारलं. पण आम्ही धर्म पाहून नाही तर त्यांचं कर्म पाहून मारलं. तसंच, भारत हा असा देश आहे जिथे महिला मुंग्याही मारत नाहीत, तर त्यांच्यासाठी पीठ बाजूला ठेवतात असंही ते म्हणाले.
दहशतवादी येथे आले आणि त्यांचा धर्म विचारून लोकांना मारलं. मात्र, आम्ही धर्म पाहून नाही तर त्यांचं कर्म पाहून मारलं. रामायणाचे उदाहरण देत राजनाथ सिंह म्हणाले की, जेव्हा सीताजी लंकेत होत्या तेव्हा रावणाने त्यांचं अपहरण केलं. जेव्हा हनुमानजी तिथे पोहोचले तेव्हा त्यांनी गोंधळ घातला आणि जेव्हा ते सीताजींजवळ पोहोचले तेव्हा त्यांनी अतिशय विनम्रतेने म्हटलं, “हे हनुमान!
भारताविरोधात निर्णय घेऊन स्वत:च्या पायावरच पाकिस्तानने मारली कुऱ्हाड, तोनिर्णय आला अंगलट
तुम्ही काय केलं? तुम्ही लंकेत इतका गोंधळ का केला? तुम्ही इतक्या लोकांना का मारलं? हनुमानजी अतिशय विनम्रपणे बसले आणि सीताजींना हात जोडून म्हणाले, हे आई, जिन मोही मारा, तीन मै मारे. म्हणजेच ज्यांनी आमच्या लोकांना मारले, त्यांना आम्ही मारलं.
राजनाथ सिंह म्हणाले, पहलगाम घटनेनंतर त्यांनी गृहीत धरलं होतं की भारत शांत बसेल. पंतप्रधानांचा संकल्प होता की आम्ही याला योग्य उत्तर देऊ… धर्म विचारून आम्ही मारू अशी कल्पनाही करता येत नव्हती. आम्ही मारण्यावर विश्वास ठेवत नाही. आम्ही कर्म पाहून त्यांना मारलं असंही ते म्हणाले.