मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अवमानाप्रकरणी उद्धव ठाकरे राहुल गांधींच्या थोबाडीत लगावणार का? असा खोचक सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. राहुल गांधींनी सावरकरांचा अवमान केल्या प्रकरणी त्यांचा तीव्र शब्दांत निषेध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. नूकतीच मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
मोठी बातमी : महाविकास आघाडीत ‘बिघाडी’; काँग्रेसच्या बैठकीवर ठाकरे गटाचा बहिष्कार
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मनिष अय्यंगार यांनी जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला होता त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी अय्यंगारच्या थोबाडात दिली होती. आज उद्धव ठाकरे राहुल गांधी यांच्या थोबाडात लगावणार आहेत काय? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरेंना केला आहे.
कालच्या सभेत उद्धव ठाकरेंनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अवमानप्रकरणी बोलले आहेत. सावरकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही असं वक्तव्य ठाकरेंनी केलं. सहन करणार नाही म्हणजे नक्की काय करणार? हे उद्धव ठाकरे यांना उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. उद्धव ठाकरेंनी नूसतं बोलून चालणार नाही तुम्ही कृतीतून बोलून दाखवा, असंही आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना केलं आहे.
पवारांचं नाव घेतलं की गोप्याच्या XXXला आग लागली समजा, मिटकरींचा हल्लाबोल
दरम्यान, राहुल गांधी यांची खासदारकी कायद्यानूसार गेली आहे. न्यायालयाने निर्णय दिल्यानंतरच राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली आहे. एकीकडे राहुल गांधी वारंवार सावरकरांचा अपमान करीत आहेत. तर दुसरीकडे अधिवेशनात काँग्रेसचे आमदार मूग गिळून गप्प होते. का आणि कशासाठी महाविकास आघाडीसाठी का? असाही खोचक सवाल त्यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांवर निशाणा साधत केला आहे.
उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील नेते हे सर्वच ठरवून करीत आहेत. पण आता सर्व सावरकरप्रेमी पक्षीय मतभेत बाजूला सारत सावरकरांच्या अवमानाप्रकरणी रस्त्यावर उतरले आहेत. तुम्ही मारल्यासारखं करा, मी रडल्यासारखं करतो, असं ठाकरे पिता-पुत्राकडून सुरु असल्याचं ते म्हणाले आहेत. हे असंच सुरु राहणं म्हणजे महाराष्ट्राचं दुर्देव असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केलीय.