मोठी बातमी : महाविकास आघाडीत ‘बिघाडी’; काँग्रेसच्या बैठकीवर ठाकरे गटाचा बहिष्कार

  • Written By: Published:
मोठी बातमी : महाविकास आघाडीत ‘बिघाडी’; काँग्रेसच्या बैठकीवर ठाकरे गटाचा बहिष्कार

राहुल गांधी यांना लोकसभा सदस्य म्हणून अपात्र ठरवल्यानंतर काँग्रेसकडून देशभर आंदोलन केलं जात आहेत, देशभरात निदर्शने सुरूच आहेत. आज सोमवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सोबत सर्व विरोधी पक्षाचे नेते खासदार काळ्या कपड्यात संसदेत पोहोचले होते. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून आज सर्व विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे.

पण या बैठकीवर शिवसेना- ठाकरे गटाकडून मात्र बहिष्कार घातला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना याची माहिती दिली. राहुल गांधी यांनी स्वातंत्रवीर सावरकर यांच्याबद्दल काढलेल्या उद्गाराचा निषेध म्हणून ठाकरे गटाकडून याचा या बैठकीवर बहिष्कार घातला आहे.

मतासाठी लोणी लावणार नाही, नाहीतर माझ्याजागी दुसरा कोणीतरी येईल; गडकरींकडून राजकीय निवृत्तीचे संकेत

काय म्हणाले होते राहुल गांधी?

राहुल गांधी यांच्यावर कारवाई झाल्यानंतर सर्व विरोधी पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला. पाठिंबा दिल्याबद्दल मी सर्व विरोधी पक्षांचे आभार मानतो, आम्ही सर्व एकत्र काम करू. असं राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी माफी मागणार का ? या प्रश्नावर ते म्हणाले- गांधी कधीही दिलगिरी व्यक्त करीत नाहीत. मी सावरकर नाही.

टीका आम्ही खपवून घेणार नाही

याच प्रश्नांवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका मांडली होती. ते म्हणाले की, महाराष्ट्रात सावरकरांवर टीका करणे, त्यांना माफिवीर म्हणणं अशा प्रकारची टीका आम्ही खपवून घेणार नसल्याचे यावेळी राऊतांनी सांगितले. आमच्या अनेक पिढ्या आम्ही लहानपणापासून सावरकरांकडून प्रेरणा घेऊन लढाईला उतरलो आहोत.

मालेगावच्या जाहीर सभेत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray)ते स्पष्ट केले आहे. आज सामनातून सुद्धा आमची भूमिका स्पष्ट केली आहे. मला असं वाटतं की, मी आज दिल्लीला जाणार आहे. या विषयावर राहुल गांधींना याविषयावर बोलणार आहे.

उद्धव ठाकरे हे राहुल गांधींच्या थोबाडीत लगावणार का?

सावरकर यांचा सातत्याने होणारा अपमानावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याच मुद्द्यावरून आज मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांनी एकत्रित पत्रकार घेतली. यामध्ये शिंदेंनी ठाकरेंना थेट सवाल करत बाळासाहेबांप्रमाणे राहुल गांधीच्या थोबाडीत देण्याची हिंमत तुमच्यात आहे का? असा सवाल केला. ते म्हणाले की, राहुल गांधी सावरकारांचा वारंवार अपमान करत आहेत, बाळासाहेब ठाकरेंनी मणीशंकर अय्यर यांच्या थोबाडीत मारली होती, ती हिंमत उद्धव ठाकरेंमध्ये आहे का?

काय म्हणाले पटोले?

सावरकरांच्या मुद्द्यांवर बोलताना नाना पटोले म्हणाले की, देशात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीचा विचार करून एका मोठ्या लढाईसाठी काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस किमान समान कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्र आलेले आहेत. सध्या देश, लोकशाही व संविधान वाचवण्याची लढाई महत्वाची आहे. ही लढाई मोठी असून भाजपाविरोधातील लढाईसाठी आम्ही एकत्र लढत आहोत. सावरकर यांच्याबद्दल काँग्रेस पक्षाची भूमिका पहिल्यापासून स्पष्ट आहे, त्यात नवीन काहीच नाही. परंतु सावरकर मुदद्यावरून महाविकास आघाडीत फूट पाडण्याचे षडयंत्र विरोधक करत आहेत परंतु त्यात त्यांना यश येणार नाही, आम्ही एकत्रच आहोत. देशातील जनतेच्या ज्वलंत प्रश्नावर भाजपा व मोदी सरकारकडे उत्तर नाही म्हणूनच ते सावरकरांसारखे मुद्दे पुढे करून जबाबदारीपासून पळ काढत आहेत.

Mallikarjun Kharge : पंतप्रधान मोदी लोकशाही संपवत आहेत; अदाणींची एवढी संपत्ती कशी वाढली?

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube