Download App

खोटे कुणबी दाखले देणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार, CM शिंदेंचा इशारा

ओबीसींवर आम्ही अन्याय होऊ देणार नाही, खोटे कुणबी दाखले कोणाला देणार नाही, खोटे कुणबी दाखले असतील तर ते तपासले जातील.

  • Written By: Last Updated:

OBC reservation : मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण (Maratha Reservation) देऊ नये यासाठी लक्ष्मण हाकेंनी (Laxman Hake) उपोषणाचे हत्यार उपसले. आज त्यांच्या उपोषणाचा नववा दिवस असून त्यांच्या आंदोलनाची सरकारने घेतली आहे. आज ओबीसी शिष्टमंडळाची राज्य सरकारबरोबर महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत ओबीसींवर आम्ही अन्याय होऊ देणार नाही, खोटे कुणबी दाखले कोणाला देणार नाही, खोटे कुणबी दाखले असतील तर ते तपासले जातील, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Chief Minister Eknath Shinde) दिल्याचं छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) सांगितलं.

आता ओबीसींचे प्रश्न सोडविण्यासाठीही मंत्रिमंडळाची उपसमिती; मुख्यमंत्र्यांनी घेतले चार मोठे निर्णय 

ओबीसी नेत्यांच्या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, पंकजा मुंडे आणि ओबीसी कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत काय चर्चा झाली? यासंदर्भात माहिती देताना छगन भुजबळ म्हणाले, ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाके यांच्यासह काही जण उपोषणाला बसले आहेत. ते उपोषण सोडवावं म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिष्टमंडळाला भेटीसाठी बोलावले होते. त्यावेळी मोठी चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं की, खोटी कुणबी प्रमाणपत्र कोणालाही दिले जाणार नाहीच. खोटे कुणबी दाखले असतील तर ते तपासले जातील, बनावट-खोटी दाखले देणाऱे आणि घेणारे गुन्हेगार असतील त्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई होईल, सर्व मराठा समाजाला सरसकट ओबीसी ही मागणी मान्य करता येणार नाही, कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, असं या बैठकीत ठरवण्यात आलंय.

शिंदे-फडणवीसांसमोरच भुजबळांचा पारा चढला, म्हणाले, ‘सयेसोयरेची अधिसूचना काढू नका…’ 

पुढं बोलतांना भुजबळ म्हणाले की, अनेकदा विविध दाखले काढून आरक्षण मिळविण्याचा प्रयत्न केला जातो. तर यापुढे अशा प्रकारचे वैयक्तिक दाखले आधार कार्डशी लिंक केले जातील, अशी कल्पना पुढे आली आहे. याचे आम्ही स्वागत करतो, असंही भुजबळ म्हणाले. त्यामुळं एका व्यक्तीला केवळ एकाच योजनेचा लाभ घेता येईल आणि सरकारचीही फसवणूक होणार नाही, असे ते म्हणाले.

मराठ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ज्याप्रमाणे मंत्रिमंडळात समिती आहे, त्याचप्रमाणे ओबीसी आणि भटक्या समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे भुजबळ म्हणाले.

निवडणुकीपूर्वी आणि नंतर विविध समाजाच्या घरांवर लहान लहान हल्ले झाले, हाणामाऱ्या झाल्या, बदला घेण्यात आला, याबाबत कडक कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचं भुजबळांनी पत्रकारांना सांगितलं.

follow us

वेब स्टोरीज