Eknath Shinde : बदलापूरमधील शाळेत दोन लहान मुलींवर झालेल्या बलात्काराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र, या बंदविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) धाव घेतली होती. या याचिकेवर झालेल्या सुनावणीवेळी मुंबई उच्च न्यायालयाने हा बंद बेकायदेशीर असल्याचे म्हटलं. दरम्यान, आता या निर्णयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘या’ दिवशी समरजित घाटगे करणार राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये प्रवेश, जयंत पाटलांची मोठी घोषणा
कोर्टाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र काय बंद करता, राजकारण बंद करा, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
राज्यात काहीतरी भयंकर घडवण्याचा प्रयत्न
महाविकास आघाडीने २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. उद्या दिलेली महाराष्ट्र बंदची हाक बेकायदेशीर असल्याचा निर्वाळा आज मुंबई हायकोर्टाने दिला. त्याविषयी सीएम शिंदेंना विचारले असता ते म्हणाले, विरोधकांचे काय चालू आहे? राज्यात काहीतरी भयंकर घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोणी म्हणतं बांगलादेश होईल. हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. तुम्ही मतांसाठी, सत्तेसाठी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन प्रचार करता. तुम्ही संवेदनशील असाल तर या दुर्दैवी घटनेचे राजकारण करणे बंद करा, असं शिंदे म्हणाले.
पुढं ते म्हणाले, महाराष्ट्र काय बंद करता? हे राजकारण बंद करा. कोर्टानेही हा बंद बेकायदेशीर ठरवला आहे. कोर्टाने म्हटलंय की, अशा बंदला परवानगी देता येणार नाही. ही न्यायालयाची चपराक आहे. या दुर्दैवी घटनेचे राजकारण बहिणी कधीही खपवून घेणार नाहीत. महाराष्ट्रात जे सत्तेला हपापलेले आहेत, ते बंदच्या निमित्ताने कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करत आहेत, अशी टीका शिदेंनी केली.
मोठी बातमी : संविधानाचा आदर राखून उद्याचा ‘महाराष्ट्र बंद’ मागे घ्या; शरद पवारांचे आवाहन
मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र बंद बेकायदेशीर ठरवल्यानंतर शरद पवार यांनी उद्याचा बंद मागे घेण्याचे आवाहन केले. पवार म्हणाले की, भारतीय न्यायव्यवस्था ही घटनात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखत उद्याचा बंद मागे घ्यावा, असं पवारांनी म्हटलं.
दरम्यान, पवारांच्या आव्हानानंतर काँग्रेसनेही महाराष्ट्र बंद मागे घेतला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, आम्ही बंद करणार नाही, पण जनतेने बंद केल्यास त्याच्याशी आमचा संबंध नसेल, असं त्यांनी स्पष्ट केलं.