‘या’ दिवशी समरजित घाटगे करणार राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये प्रवेश, जयंत पाटलांची मोठी घोषणा
Jayant Patil On Samarjit Ghatge : गेल्या वर्षभरापासून माझ्या मनात असलेली चिंता आज मिटली आहे आणि याचा मी आनंद व्यक्त करतो. शाहू, फुले, आंबेडकर यांचा विचार सोडल्यानंतर बहुजन समाज कसा एकवटतो हे लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरकरांनी दाखवून दिला आणि आता ऑक्टोबर – नोव्हेंबरच्या विधानसभा निवडणुकीत दाखवून द्याचे आहे असं जयंत पाटील (Jayant Patil) कोल्हापुरात (Kolhapur) बोलताना म्हणाले.
तसेच राज्यातील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी महाविकास आघाडी एकसंघ आहे त्यामुळे समरजित घाटगे (Samarjit Ghatge) यांनी निर्णय लवकर करावा अशी मी त्यांना विनंती करत होतो असेही यावेळी जयंत पाटील म्हणाले.
पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, सकाळी समरजित घाटगे यांनी मला मेसेज केला आणि तुम्ही कोल्हापुरात येऊन माझ्या कार्यकर्त्यांशी बोला असं सांगितले. मात्र आम्ही टप्यात आला की लगेच कार्यक्रम करतो त्यामुळे मी आजच इकडे आलो असं जयंत पाटील म्हणाले. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही शरद पवार यांच्या नेतृत्वात काम करत आहे. राज्यात शरद पवार (Sharad Pawar) यांनी अनेक नेते घडवले त्यापैकी त्यांना काही नेते सोडून गेले तरीही पवार साहेब मागे हटले नाही. वस्तादाचा एक डाव शेवटचा ठेवलेला असतो असं म्हणत त्यांनी अजित पवारांना (Ajit Pawar) टोला लावला.
तसेच गेल्या 9 ते 10 वर्षांच्या कालखंडात तुम्ही समरजित घाटगेंना पूर्ण ताकदीने उभा करून प्रतिकूल परिस्थिती असताना आणि सत्ता नसताना देखील तुम्ही समरजित घाटगेंना ताकद दिली. त्यामुळे मी आज तुमच्या कार्यकर्त्यांशी बोलतो असं त्यांना म्हटले.
3 तारखेला कागलमध्ये समरजित घाटगे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
तर पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, महाविकास आघाडीच्या नियमाप्रमाणे उमेदवार जाहीर करता येणार नाही मात्र पुढच्या सभेत मी याबाबात बोलतो. शरद पवार स्वतः समरजित घाटगे यांचा प्रवेश करायला येणार आहे.
SL Vs NZ 2024 : 5 दिवस नाही, श्रीलंका – न्यूझीलंडमधील पहिला कसोटी सामना चालणार 6 दिवस, ‘हे’ आहे कारण
येत्या 3 तारखेला कागलमध्ये समरजित राजे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होणार, कागलच्या गैबी चौकात हा प्रवेश होणार अशी देखील घोषणा जयंत पाटील यांनी यावेळी केली. तसेच नेहमीच शरद पवार साहेब समरजित घाटगे यांच्या पाठीशी राहणार असेही यावेळी जयंत पाटील म्हणाले.