Devendra Fadnavis : आव्हानं खूप आहेत. राजकारणात सर्व स्तरावर जाऊन लोक राजकारण करतात. पण दहा वर्षाचा माझा कार्यकाळ पाहिला असेल तर कितीही आवाहन आलं तरी मी धैर्यपूर्वक आव्हानांना सामोरे जात असतो. (Devendra Fadnavis) सत्ता मी कधीच डोक्यात जाऊ देत नाही. सत्ता हे सेवेचं साधन म्हणून मी पाहतो. मी माझ्या डोक्यात कधीही सत्ता जाऊ देणार नाही असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.
मान उंच राहिली पाहिजे
पुढील पाच वर्षात आम्ही लोकांना घरे देणार आहोत. सर्व योजनांतून जी घरे होतील, त्या लोकांना सोलर देणार आहे. घरात राहायला जाणाऱ्यांना मोफत वीज मिळेल. त्यांना बिलच येणार नाही. हा आमचा प्रयत्न आहे. मला जी काही संधी मिळाली आहे. त्या संधीचं सोनं करेल. नागपूरकर म्हणून नागपूरची मान उंच राहिली पाहिजे. आपला प्रतिनिधी काम करत असताना महाराष्ट्रात बदल घडतोय अशी उंची महाराष्ट्राला देणार आहे. पारदर्शी कारभार करणार आहे असं आश्वासनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.
CM देवेंद्र फडणवीस यांची सोशल मीडियावर बदनामी, 12 प्रोफाईल विरोधात गुन्हा दाखल
काही नालायक लोक तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांना लुबाडत आहेत. जाती जातीत द्वेष निर्माण करत आहेत. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार सायबर अवेयरनेस करत आहे. सायबर सेक्युरिटीचं काम सुरू आहे. डिजीटल आणि सायबर प्लॅटफॉर्मचं एकत्रीकरण केलं आहे. जगातील बेस्ट टुल्स आपल्याकडे आहे. त्याद्वारे आपण वेगाने सायबर गुन्हे उघडकीस आणू शकतो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
आपण सहगुन्हेगार
विधानसभेत बोलत असताना नक्षलवादी कसे संविधान मानत नाहीत. काही लोकांनी नक्षलवादी हा शब्द काढून टाकला. पण त्यांना माहीत नाही एखादी चुकीची गोष्ट आपण सोशल मीडियावर टाकतो. त्याचं 100 टक्के फूटप्रिंट आम्हाला शोधता येतं. एकाने टाकलं आणि 100 लोकांनी फॉरवर्ड केलं तर तेही लगेच शोधता येतं. आता सर्व माहिती व्हॉट्सअपला मागता येते. त्यामुळे सर्वांना हात जोडून विनंती आहे की, नुसता गुन्हा करणारा गुन्हेगार नाही, तर अशा गोष्टी फॉरवर्ड केल्याने आपण सहगुन्हेगार होतो. अशा प्रकारच्या खोट्या गोष्टी फॉरवर्ड करू नये. जोपर्यंत अवेयरनेस होऊ शकत नाही, तोपर्यंत हे आव्हान राहणारच आहे असंही ते म्हणाले आहेत.