Devendra Fadnavis : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात अमराठी रिक्षा आणि ऑटो टॅक्सी चालकांचा मुद्दा चर्चेत आहे. राज्य सरकारने चालकांना मराठी भाषा सक्तीची केली आहे. तर दुसरीकडे काही चालकांनी या निर्णयाला विरोध देखील केला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात आज रिक्षा आणि ऑटो चालकाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत मुदत देण्याची विनंती केली होती. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोठी घोषणा करत अमराठी रिक्षा आणि ऑटो चालकांना जुजबी मराठी शिकण्यासाठी एका वर्षाची मुदत जाहीर केली आहे. चालकांना एका वर्षाची मुदत देण्यात आल्यानंतर आता त्यांच्यावर वर्षभर कोणतीही कारवाई होणार नसल्याची माहिती देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.
माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, हाजी अराफत (Haji Arafat) यांच्या नेतृत्वात ऑटो आणि रिक्षा चालकांना (Rickshaw And Auto Drivers) आज माझी भेट घेतली आहे. यावेळी शिष्टमंडळाने जुजबी मराठी आली पाहिजे याचं समर्थन केलं आहे. मराठी शिकण्याचा आमचा प्रयत्नही सुरु आहे. भविष्यातही प्रयत्न करत राहू असं त्यांनी सांगितलं. मात्र वेगवेगळ्या वयातील रिक्षा, टॅक्सी चालकांना कमी वेळात मराठी शिकता येणार नाही त्यासाठी आम्हाला काही वेळ देण्यात यावा अशी विनंती शिष्टमंडाळाकडून करण्यात आली होती. त्यांनी किमान एक वर्षाची मुदत वाढ देण्यात यावी अशी विनंती त्यांनी केली होती. त्यामुळे या अमराठी रिक्षा आणि ऑटोचालकांना जुजबी मराठी शिकवण्यासाठी एक वर्षाची मुदत वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असं माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
🕔 4.51pm | 27-8-2026📍Mumbai.
LIVE | Media Interaction#Maharashtra #Mumbaihttps://t.co/7usl6czFRl
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 27, 2026
Awarapan 2 ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरूच; 12 व्या दिवशी 3.21 कोटींची कमाई –
एका वर्षासाठी कारवाई होणार नाही
माध्यमांशी बोलताना पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकवण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्यावर वर्षभर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. एका वर्षात क्लासेस लावून किंवा मराठी साहित्याचा अभ्यास करुन ही संघटना रिक्षा आणि टॅक्सीचालकांना जुजबी मराठी शिकवतील. रिक्षाचालक आणि ऑटो चालकांचं शिष्टमंडळ समोरुन आलं आणि त्यांनी विनंती केली. वेळ वाढवून मागितली. त्यामुळे वेळ वाढवून देणे त्यांना आवश्यक होतं.
