Download App

CM फडणवीसांची कबुली, ‘त्या’ 72 तासात महायुती सरकारची मुहूर्तमेढ रोवली गेली

Devendra Fadnavis : मी दोन वेळा मुख्यमंत्री झालो नाही तर तीन वेळा झालो त्यात सर्वात कमी तासांचा मुख्यमंत्री आणि अजित पवार (Ajit Pawar) हेही

Devendra Fadnavis : मी दोन वेळा मुख्यमंत्री झालो नाही तर तीन वेळा झालो त्यात सर्वात कमी तासांचा मुख्यमंत्री आणि अजित पवार (Ajit Pawar) हेही कमी तासांचे उपमुख्यमंत्री असा आमचा रेकॉर्ड झाला आहे. पण आज जे मजबूत राज्य दिसतेय त्याची त्या 72 तासातच मुहूर्तमेढ रोवली गेली होती अशी स्पष्ट कबुली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाच्या कार्यक्रमात दिली.

आज गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव-2025 च्या (Maharashtra Festival-2025) तिसर्‍या दिवसाच्या कार्यक्रमात राज्यातील माजी मुख्यमंत्र्यांचा सन्मान करण्यात आला. गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाला सर्वच माजी मुख्यमंत्री आले असते तर बरे झाले असते. हा राजकीय मंच नव्हता तर हा गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव होता मात्र आज जे आले त्यांचा सन्मान करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसने आमचा सन्मान केला त्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी धन्यवाद दिले.

अतिशय सुंदर असा गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केला आहे. महाराष्ट्राच्या विविध छटा एकाच ठिकाणी पहाता येतील असे आयोजन करण्यात आले आहे. इतकी सुंदर दालने आहेत की, प्रत्येक तरुण पिढीने ती पाहिली पाहिजेत. महाराष्ट्र काय आहे हे त्यात पहायला मिळत आहे. शक्तीचा आणि भक्तीचा इतिहास आहे, थोर पुरुष आणि महाराष्ट्र रत्न पहायला मिळतात. धावता इतिहास पहाता येईल अशी प्रभावी मांडणी आहे. चित्रकला मूर्ती कला दाखवली आहे. खाद्य संस्कृतीही आहे. मिनी महाराष्ट्र साकारण्याचे काम केल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले.

या उपक्रमात महाराष्ट्राचा धावता इतिहास सांगितला गेला. स्वातंत्र्योत्तर काळातनंतर संयुक्त महाराष्ट्र करायला लढा द्यावा लागला. त्यावेळी राजकीय परिस्थिती होती त्यामुळे लढा उभारला गेला 106 जणांना हौतात्म्य पत्करावे लागले. ही संयुक्त महाराष्ट्राची गाथा, लढा नवीन पिढीला माहित नाही हा उपक्रम पोचवण्याचा प्रयत्न केला आहे. मंत्रालयातही असा उपक्रम ठेवावा असे आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी केले.

65 वर्षात झालेल्या माजी मुख्यमंत्र्यांचा सन्मान हे चांगले आयोजन आहे. सिंहावलोकन केले तर काही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री झाले त्या सर्वांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत वाटा उचलला आहे. अशा नेत्यांचा सन्मान व्हावा अशा माध्यमातून हा सत्कार आयोजित केल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कौतुक केले.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे,  माजी मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ,महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, माजी मंत्री धनंजय मुंडे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर,  राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले आदींसह पक्षाचे आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

एफडी पेक्षा जबरदस्त, ‘या’ बचत योजनेत करा गुंतवणूक, मिळणार 8.2 % व्याज

दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडी काळातील मुख्यमंत्री राहिलेले, माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी  तर महाविकास आघाडीचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे परदेश दौऱ्यावर असल्यामुळे कार्यक्रमाला पाठ फिरवली.

follow us