राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने वरळीच्या जांबोरी मैदानावर ‘महाराष्ट्र महोत्सव’ ; सुनिल तटकरे

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने वरळीच्या जांबोरी मैदानावर ‘महाराष्ट्र महोत्सव’ ; सुनिल तटकरे

Sunil Tatkare On Maharashtra Mahotsav : राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने (NCP) दिनांक 1 ते 3 मे रोजी गौरवशाली महाराष्ट्राचा 65 वा वर्धापन दिन वरळीच्या जांबोरी मैदानावर ‘महाराष्ट्र महोत्सव’ (Maharashtra Mahotsav) म्हणून साजरा करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना आज दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र महोत्सव म्हणून राज्यभर साजरा केला जाणार आहे. त्यासंदर्भात आज प्रदेश कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीनंतर सुनिल तटकरे यांनी ही माहिती दिली. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, 106 हुतात्म्यांच्या बलिदानानंतर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी आणलेला मंगल कलश आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा, जिजाऊंचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र ही या महाराष्ट्राची ओळख आहे.

सर्वदूर क्षेत्रात महाराष्ट्राची जी ओळख आहे, महाराष्ट्राने जी प्रगती केली आहे त्याचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न ‘महाराष्ट्र महोत्सवातून’ राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात येणार आहे असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पक्षातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि वेगवेगळ्या क्षेत्रात जे मान्यवर काम करतात त्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत.

राज्य सरकारचा मोठा निर्णय, घरकुलांच्या लाभार्थ्यांसाठी 5 ब्रासपर्यंत वाळू मोफत मिळणार

येत्या पाच – सहा दिवसात या संपूर्ण कार्यक्रमाची रुपरेषा तयार झाली की ती महाराष्ट्रातील जनतेसमोर मांडणी केली जाईल असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

पहिल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण; ‘चित्रपताका’ नावाने होणार महोत्सव

follow us
  • fb
  • instagram
  • youtube