Devendra Fadnavis On Sharad Pawar : भारतीय क्रिकेट विकसित करणाऱ्या प्रशासकांमध्ये पवार साहेबांचं नाव अग्रणी असेल. शरद पवार साहेबांनी (Sharad Pawar) आयसीसी (ICC), बीसीसीआय (BCCI) आणि एमसीएचे (MCA) अध्यक्ष म्हणून केलेलं काम खूप मोठं आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले आहे. ते आज मुंबईतील वानखेडे मैदानावर एमसीएच्यावतीने आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) , राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. आज एमसीएच्यावतीन वानखेडे स्टेडियममध्ये (Wankhede Stadium) स्टँडचं नामकरण करण्यासाठी एक भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता. आज वानखेडे स्टेडियममध्ये शरद पवार,रोहित शर्मा आणि भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांच्या नावाने स्टँडचं नामकरण करण्यात आलं आहे. याच बरोबर एमसीएचे माजी अध्यक्ष अमोल काळे यांच्या नावाने एमसीए ऑफिस लाउंजचेही उद्घाटन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी मुंबई क्रिकेट असोसिएशन एमसीएचं मनापासून अभिनंदन करेल, की त्यांनी हा निर्णय घेतला. शरद पवार साहेबांबद्दल सांगायची गरज नाही. भारतीय क्रिकेटमध्ये, क्रिकेटच्या विकासासाठी त्यांनी केलेलं काम नक्कीच मोठं आहे. भारतीय क्रिकेटसाठी शरद पवारांचं योगदान मोठं असून आज भारतीय क्रिकेट ज्या स्तरावर आहे, त्याच श्रेय पवार साहेबांचं आहे. असं या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
‘भूतकाळातून सुटका अशक्य ; ‘जारण’ चा चित्तथरारक टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
तर या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोठी घोषणा करत मुंबईत 1 लाख प्रेक्षक बसतील एवढ्या क्षमतेचं उत्तम क्रिकेट स्टेडियम उभारणार असल्याचं म्हटलं आहे. एमसीने प्रस्ताव दाखल करावा, महाराष्ट्र सरकार योग्य जागा देईल. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.