Devendra Fadnavis : गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळात बदल होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. या फेरबदलचा परिणाम राज्यातील राजकारणात देखील होणार असल्याचं सांगितलं जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यात अचानक वाढ झाल्याने राज्यातील राजकारणात काहीतरी मोठं होणार असं सांगितलं जात आहे.
तर आता आणखी एक मोठी अपडेट समोर येत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात (Union Cabinet) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची वर्णी लागणार असून पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची निवड होण्याची शक्यता काही मीडिया अहवालात
वर्तवण्यात येत आहे. तर दुसरीकडे मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून याबाबत कोणतेही संकेत देण्यात आलेले नाही. मीडिया अहवालानुसार केंद्रात पावसाळी अधिवेशानंतर (Monsoon Session) मंत्रिमंडळात बदल होण्याची शक्यता आहे. या बदलानंतर राज्यातील मंत्रिमंडळात देखील मोठे बदल होण्याची चर्चा राज्यातील राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे.
तर दुसरीकडे या फेरबदलात शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी केंद्रीय मंत्री म्हणून मंत्रिमंडळात संधी मिळणार असल्याचा देखील दावा करण्यात येत आहे. तर शिवसेना ठाकरे गटातून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या फुटीर खासदारांपैकी एक किंवा दोन खासदारांना मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून संधी देण्यात येणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.
ऑनलाईन MPSC परीक्षेला स्थगिती; CM फडणवीसांचे राज्य लोकसेवा आयोगाला आदेश
तर नितीन गडकरी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या मंत्रालयात बदल होणार असल्याची देखील माहिती सध्या समोर आली आहे मात्र केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल कधी होणार याबाबत आतापर्यंत केंद्र सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
