CM Fadnavis’s response to Raj Thackeray’s demand to scrap SIR : मुंबईत 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविरोधात ‘गर्जना मोर्चा’ काढण्यात आला होता. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) यांच्या राजीनाम्यासह महाराष्ट्रातील एसआयआर प्रक्रिया रद्द करावी आणि आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. मात्र आता SIR रद्द करण्याच्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी मुद्देसूद उत्तर दिले आहे.
नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री फणवीस?
राज ठाकरे यांच्या मोर्चातील आरोपांना उत्तर म्हणून फडणवीसांनी एक्स अकाऊंटवर एक पोस्ट केली. त्यामध्ये ते म्हणाले की, अचूक आणि अद्ययावत मतदार यादी, विश्वासार्ह निवडणूक प्रक्रियेचा आधार!
विवेकानंद पाटील यांना घर बांधून देणार, विश्वजीत कदमांची मोठी घोषणा
प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा अधिकार मिळावा आणि मतदार यादीतील नोंदी अचूक व विश्वासार्ह राहाव्यात, यासाठी विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) ही महत्त्वाची प्रक्रिया आहे. महाराष्ट्रातील SIR 2026 अंतर्गत 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर SIR 2026 मधील महत्त्वाची माहिती…
महाराष्ट्र SIR 2026 – आकडेवारी –
1 SIR पूर्वी महाराष्ट्रातील 9.78 कोटींहून अधिक मतदार प्रारूप मतदार यादीच्या पुनरीक्षणासाठी आधारभूत यादीत होते.
2 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत 7.71 कोटींहून अधिक मतदारांचा समावेश करण्यात आला आहे.
3 जुन्या मतदार यादीतील ज्या मतदारांची संबंधित गणना प्रपत्रे प्राप्त झालेली नाहीत, त्यांची नावे गैरहजर, स्थलांतरित, मृत, अन्यत्र नोंद झालेली (दुबार नोंदणी) किंवा इतर कारणांमुळे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट करण्यात आलेली नाहीत.
4 अशा मतदारांची ASDD (Absent, Shifted, Dead, Duplicate) यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. EPIC क्रमांकाच्या आधारे नागरिकांना आपले नाव तपासता येणार असून मतदान केंद्रनिहाय ASDD यादी डाउनलोड करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.
5 प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना प्रपत्र-6 आणि घोषणापत्राद्वारे नाव समाविष्ट करण्याची संधी देण्यात आली आहे.
6 1 ऑक्टोबर 2026 रोजी किंवा त्यापूर्वी 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांनाही प्रपत्र-6 द्वारे अर्ज करता येणार आहे.
7 ऑनलाइन अर्ज भारत निवडणूक आयोगाच्या Voter Services Portal वर करता येतो. संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडे ऑफलाइन पद्धतीनेही अर्ज करता येणार आहे.
8 प्रारूप मतदार यादी आणि SIR अंतर्गत ASDD यादी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. नागरिकांना EPIC क्रमांक, वैयक्तिक तपशील किंवा मोबाईल क्रमांकाद्वारे आपले नाव तपासता येणार आहे.
9 योग्य पडताळणीनंतर पात्र मतदारांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्यात येतील. त्यामुळे प्रत्येक पात्र नागरिकाने प्रारूप मतदार यादीत आपले नाव तपासून आवश्यक असल्यास विहित प्रक्रियेद्वारे अर्ज करणे महत्त्वाचे आहे.
