Download App

Commercial LPG Cylinder : घरगुती गॅस सिलेंडरनंतर मोदी सरकारचा आणखी एक दिलासा!

  • Written By: Last Updated:

Commercial LPG Cylinder : मोदी सरकारने व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या (Commercial LPG Cylinder ) किंमती कमी करून आणखी एक दिलासा दिला आहे. महागाईने होरपळणारी देशातील जनता निवडणुकीत मतपेटीतून राग व्यक्त करू नये याची काळजी मोदी सरकार घेत आहे. त्यामुळे नुकतचं स्वयंपाकाच्या गॅसचे दर कमी करण्यात आले आहेत. रक्षाबंधनानिमित्त मोदी सरकार घरगुती गॅसच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला. गॅसच्या किंमती थेट 200 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी जाहीर केला. त्यानंतर आता मोदी सरकारने व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती कमी करून आणखी एक दिलासा दिला आहे.

One Nation, One Election अंतर्गत देशात चार निवडणुका; 2018 मध्ये लॉ कमिशनने केल्या होत्या सूचना

मोदी सरकारचा आणखी एक दिलासा!

घरगुती गॅस सिलेंडरनंतर मोदी सरकारने व्यावसायिकांना आणि अप्रत्यक्षपणे सर्वसामान्या नागरिकांना आणखी एक दिलासा दिला आहे. तो म्हणजे व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या (Commercial LPG Cylinder ) किंमती कमी करण्यात आल्या आहेत. आजपासूनच हे नवे दर लागू देखील करण्यात आले आहेत. आज 1 सप्टेंबरपासून व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर 158 रूपायांनी कमी किंमतीत मिळणार आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडर हा 19 किलोंचा असतो.

One Nation One Election हा मोदी सरकारने सोडलेला फुगा, भाजप ‘इंडिया’ला घाबरलंय; राऊतांचं टीकास्त्र

त्यामुळे आता 19 किलोंच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरसाठी (Commercial LPG Cylinder ) नवी दिल्लीमध्ये 1522 रूपये लागणार आहेत. तर कोलकात्यात 19 किलोंच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरसाठी 1636 रूपये लागणार आहेत. तर मुंबईमध्ये 1482 रूपये 19 किलोंच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत असणार आहे. तसेच चेन्नईमध्ये 1695 रूपये लागणार आहेत.

लाभ फक्त प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना

दरम्यान घरगुती गॅसच्या किंमती कमी झाल्याचा हा लाभ फक्त प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांनाच मिळणार आहे. पुढील काही महिन्यात राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील विधानसभा निवडणुका आहेत. देशात 14.2 किलो एलपीजी सिलिंडरचे रेट याआधी मार्च 2023 मध्ये बदलले होते. त्यावेळी गॅसच्या किंमती 50 रुपयांनी वाढविण्यात आल्या होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गॅसच्या किंमती 200 रुपयांनी कमी होतील. या योजनेचा फायदा उज्ज्वला गॅस योजनेतील लाभार्थ्यांना होईल. या लाभार्थ्यांना आधीचेच 200 रुपये अनुदानाच्या रुपात मिळत आहेत. आता या पद्धतीने त्यांच्या खात्यात 400 रुपये जमा होतील.

Tags

follow us