One Nation, One Election अंतर्गत देशात चार निवडणुका; 2018 मध्ये ‘लॉ कमिशन’च्या सूचना काय?
नवी दिल्ली : देशात एक देश एक निवडणुका घेण्यासाठी मोदी सरकारकडून समिती गठित करण्यात आली असून, सध्या देशभर या एका गोष्टीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मात्र, देशात अशा प्रकारे चारवेळा निवडणुका पार पडलेल्या असून, 2018 मध्ये लॉ कमिशने याबाबत काही सूचना केल्या होत्या. (Law Commission Report On One Nation One Election)
One Nation One Election हा मोदी सरकारने सोडलेला फुगा, भाजप ‘इंडिया’ला घाबरलंय; राऊतांचं टीकास्त्र
‘वन नेशन वन इलेक्शन’ च्या चर्चामध्ये आता दावे प्रतिदावे केले जात असून, वन नेशन वन इलेक्शन अंतर्गत देशात यापूर्वी चारवेळा निवडणुका झाल्या आहेत . स्वातंत्र्यानंतर 1952 मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकाही याच पद्धतीने झाल्या होत्या. यानंतर 1957, 1962 आणि 1967 मध्येही लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी झाल्या. मात्र, अनेक राज्यांतील सरकारे पडू लागल्याने आणि विधानसभा बरखास्त करावी लागल्याने एकाचवेळी निवडणुका घेण्याची ही व्यवस्था ठप्प पडली आणि राज्यांच्या निवडणुका वेगळ्या होऊ लागल्या.
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ ठरला; पुण्यातून निवडणूक लढवणार?
लॉ कमिशनच्या सूचना काय?
वन नेशन, वन इलेक्शनबाबत 2018 मध्ये लॉ कमिशने काही सूचना केल्या होत्या. तसेच याबाबत एक अहवालही सादर केला होता. ज्यात एकाचवेळी निवडणुकांमुळे देशाच्या प्रशासनाला निवडणूक प्रचाराऐवजी विकासाशी संबंधित कामांवर लक्ष केंद्रित करण्यात मदत होईल असे सांगण्यात आले होते. मात्र, घटनेच्या विद्यमान चौकटीत एकाचवेळी निवडणुका घेणे शक्य नाही, असे म्हणत याला परवानगी नाकारण्यात आली होती.
India Alliance Logo : सहभागी झालेल्या नव्या पक्षांनी केला खेळ; ‘इंडिया’ आघाडीच्या लोगोला ‘खो’
लोकसभेच्या आणि राज्य विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेतल्याने जनतेच्या पैशांची बचत होईल, प्रशासकीय यंत्रणा आणि सुरक्षा दलांवरील भार कमी होईल आणि सरकारी धोरणांची अंमलबजावणी सुनिश्चित होईल, असे 2018 मध्ये केंद्रीय कायदा मंत्रालयाला सादर केलेल्या मसुदा अहवालात सांगण्यात आले होते. मात्र, घटनेच्या विद्यमान रचनेनुसार देशात एकाचवेळी निवडणुका घेणे शक्य नसल्याने या अहवालात आणखी कोणतेही बदल करता आले नाहीत.
देशात एकाचवेळी झालेल्या निवडणुकांचा निकाल काय होता?
भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले आणि देशात पहिल्यांदा 1951-52 मध्ये निवडणुका झाल्या. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या चार लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी झाल्या होत्या. 1952, 1957, 1961 आणि 1967 मध्ये एकाचवेळी निवडणुका झाल्या, या सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेसला बंपर विजय मिळाला होता. केंद्राव्यतिरिक्त बहुतेक राज्यांमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले होते. एकाचवेळी पार पडलेल्या निवडुकांचा निकाल खालीलप्रमाणे होता.
1952 लोकसभा निवडणूक: काँग्रेस- 364, CPI- 16
1957 लोकसभा निवडणूक: काँग्रेस- 371, भाकप- 27
1962 लोकसभा निवडणूक: काँग्रेस- 361, भाकप- 29
1967 लोकसभा निवडणूक: काँग्रेस- 283, SWA- 44