मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ ठरला; पुण्यातून निवडणूक लढवणार?

मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ ठरला; पुण्यातून निवडणूक लढवणार?

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) पुणे जिल्ह्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण भाजपच्या उच्चपदस्थ नेत्यांकडून पुण्यात चाचपणी करण्यात येत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यातूनच लोकसभेसाठी निवडणूक लढवणार असल्याचा दावा उच्चपदस्थ नेत्यांनी केला आहे.

मोठा निर्णय : एक देश, एक निवडणुकीसाठी समितीची स्थापना; माजी राष्ट्रपती असणार अध्यक्ष

यासंदर्भातील माहिती विश्वसनीय सुत्रांकडून देण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी महाराष्ट्रातील पुण्यात निवडणूक लढवणार असल्याने विरोधकांसमोर एक मोठं आव्हानच उभं राहणार असल्याचं बोललं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुणे लोकसभा सोपी जाणार असल्याचं बोललं जातं आहे.

INDIA Meeting Photo: भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधक एकटवले, एका पाठोपाठ दिग्गज नेते मुंबईत…

आगामी निवडणुकीत भाजपची पिछेहाट होणार असल्याची शक्यता असल्याने राज्यात भाजपचीच सत्ता खेचून आणण्यासाठी विविध प्रकारची रणनीती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून आखली जात आहे.

मोठी बातमी! केंद्र सरकारने बोलावले 5 दिवसांचे विशेष अधिवेशन, मोदी कोणती खेळी खेळणार?

मोदींनी पुण्यात निवडणूक लढवली तर मोदींच्या प्रचाराचा प्रभाव महाराष्ट्रातील विविध मतदारसंघात दिसून येईल, असा अंदाज राजकीय नेत्यांना असल्याच्याही चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात आणि उत्तर प्रदेशातील वाराणसीमधून निवडणूक लढले होते. आता मोदी गुजरात, उत्तर प्रदेशनंतर पुण्यातून निवडणूक लढवणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube