Download App

गौतमी पाटील विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल… जाणून घ्या प्रकरण

Gautami Patil : डान्सर गौतमी पाटील ही गेल्या काही काळापासून लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. ग्रामीण भाग असू दे किंवा शहरी भाग कोणत्याही ठिकाणी तिचा डान्स पाहण्यासाठी प्रेक्षकांची तुफान गर्दी होते आहे. अनेक नामवंत लोक सुद्धा आपल्या वाढदिवसाच्या दिवशी अथवा इतर कार्यक्रमांना खास गौतमी पाटीलचा डान्सचा कार्यक्रम ठेवतात. मात्र तिच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मानसिक त्रास आणि फसवणूक केल्याप्रकरणी नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) विरोधात बार्शीत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राजेंद्र गायकवाड यांनी तक्रार दाखल केली आहे.

नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या
याबाबत अधिक माहिती अशी, नृत्यांगना गौतमी पाटीलचा सोलापूर जिल्ह्यातील (Solapur) बार्शी तालुक्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास गौतमीने कार्यक्रमस्थळी हजेरी लावली. मात्र, गौतमी ही परफॉर्मन्स करण्यासाठी रात्री थेट 9.56 वाजता स्टेजवर आली. एकच गाणं झाल्यानंतर पोलिसांनी वेळ संपली म्हणून कार्यक्रम बंद पाडला.

विशेष म्हणजे गौतमीला संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास आपले नृत्य सादर करायचे होते. गौतमी पाटील आणि तिच्या सहकाऱ्यांनी फसवणूक करून मानसिक त्रास दिल्याचा आरोप आयोजक राजेंद्र गायकवाड यांनी केला. दरम्यान या प्रकरणी गौतमी पाटील आणि तिचा सहकारी केतन मारणे यांच्याविरोधात बार्शी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. नियोजित कार्यक्रमाला उशिरा येऊन माझी बदनामी करण्याच्या हेतूने फसवणूक केल्याचेही तक्रारदार गायकवाड यांनी आरोप केला आहे.

बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांना अजामीनपात्र गुन्ह्याच्या कक्षेत आणणार

आयोजकांविरोधात देखील गुन्हा दाखल
आयोजक राजेंद्र गायकवाड याने विना परवानगी गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामुळे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आयोजक गायकवाड यांनी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र कायदा आणि सुव्यवस्था, संभाव्य गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी काही कागदपत्रांची पूर्तता करण्याचे गायकवाड यांना लेखी कळवले होते. मात्र कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता न करता त्यांनी थेट कार्यक्रम आयोजित केला.

Tags

follow us