Download App

Ahmednagar Manmad Road : अहमदनगर-मनमाड मार्ग दुरुस्तीची कामं पूर्ण करा; पालकमंत्र्यांचे निर्देश

गणेशोत्सवापूर्वी अहमदनगर-मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीची कामं पूर्ण करा असे निर्देश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

  • Written By: Last Updated:

Radhakrishna Vikhe Patil : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने गणेशोत्सवापूर्वी अहमदनगर-मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीची कामं पूर्ण करावीत आणि रस्त्यावरील सर्व खड्डे तातडीने दुरुस्त करावं,  (Radhakrishna Vikhe ) असे निर्देश राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय येथे मनमाड रस्त्याबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

Ground Zero : विवेक कोल्हे तुतारी फुंकणार? काळेंना घेरण्यासाठी पवारांचा डाव

विखे पाटील म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागतो. पावसाळ्यापूर्वी करावयाची दुरुस्तीची कामे वेळेवर करण्यात आली नाही. महामार्गाच्या थांबलेलं काम पूर्ण करण्यासाठी नवा कंत्राटदार निवडतांना त्याची काम करण्याची क्षमता लक्षात घ्यावी. खड्डे बुजविण्यासाठी एकाचवेळी एकापेक्षा अधिक संस्था नियुक्त करून तातडीने महामार्गाची दुरुस्ती करण्यात यावी. प्रशासनाचे आवश्यक तेथे सहकार्य घ्यावं. रस्ता त्वरित वाहतूक योग्य करण्यात यावा.

एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी त्वरित महामार्गाला भेट देऊन तातडीने दुरुस्तीची कामे सुरू करावी. वाहतूक वळविण्यासाठी वाहतूक मार्शल पुरेशा प्रमाणात नियुक्त करावं. नगर-छत्रपती संभाजी नगर, श्रीरामपूर-नेवासे मार्गावरील खड्डेदेखील बुजवण्यात यावं, दुरुस्तीची कामे करतांना आवश्यकतेनुसार वाहतूक वळविण्यात यावी, कोल्हार येथील पुलाच्या दुरुस्तीचे आणि रुंदीकरणाचे काम त्वरित सुरू करण्यात यावे, असे निर्देश विखे पाटील यांनी दिले.

राजकोट किल्ल्यावर राणेंकडून ठेचून मारण्याची भाषा; सुप्रिया सुळेंनी थेट भरला सज्जड दम

जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, शिर्डी ते अहमदनगर रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे आहेत. सण-उत्सवाचे दिवस असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे महामार्गावरील खड्ड्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी. त्यासोबतच कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी आणि रस्त्याचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी गांभीर्याने कार्यवाही करावी. तसंच, रस्त्याचं काम करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. पुढील आठवड्यात मार्गावरील सर्व खड्डे बुजविण्यात येतील असे महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

follow us