Download App

मोठी बातमी! कॉ. पानसरे खूनप्रकरणी तावडेचा जामीन रद्द, तात्काळ ताब्यात घेण्याचे कोर्टाचे आदेश

काॅम्रेड गोविंद पानसरे यांच्या खून प्रकरणी प्रमुख संशयित आरोपी डॉ. वीरेंद्र तावडे याचा जामीन कोल्हापूर सत्र न्यायालयानं रद्द केला आहे.

  • Written By: Last Updated:

Govind Pansare Murder Case : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खून प्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. यातील प्रमुख संशयित आरोपी डॉ. वीरेंद्र तावडे याचा जामीन कोल्हापूर सत्र न्यायालयाने रद्द केला आहे. (Govind Pansare) तसंच, तावडेला तात्काळ ताब्यात घेण्याचे आदेश दहशतवादविरोधी पथकाला दिले आहेत. (Kolhapur)  न्या. एस. एस. तांबे यांनी हे आदेश दिले. दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानंतर तावडेला अटक झाल्याची माहिती आहे.

कुटुंब हायकोर्टात संशय असेल तर मतपत्रिका चेक करा, हिरामण खोसकरांनी सांगितलं आमदार फुटीचा सर्व घटनाक्रम

पानसरे खून खटल्यात डॉ. वीरेंद्र तावडेला सन २०१३ मध्ये जामीन झाला होता. पण नुकतीच डॉ. दाभोलकर खून खटल्यात त्याची निर्दोष सुटका झाली होती. यानंतर पानसरे कुटुंबियांनी त्याचा जामीन रद्द व्हावा यासाठी हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र, हायकोर्टानं यावर निर्णय घेण्यासाठी ही याचिका पुन्हा सत्र न्यायालयात वर्ग केली होती. यावर आज सुनावणी पार पडली यावेळी न्या. एस. एस. तांबे यांनी तावडेचा जामीन रद्द करुन त्याला तत्काळ अटक करण्याचे आदेश दिले.

जामीन मिळाला होता पूजा खेडकरच पिंपरी-चिंचवड कनेक्शन; महापालिकेच्या ; रुग्णालयातूनही घेतलं दिव्यांग प्रमाणपत्र

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर कोल्हापूर येथे १६ फेब्रुवारी २०१५ रोजी गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतर त्यांच्यावर चार दिवस उपचार सुरू होते. मात्र, दुर्दैवाने चार दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. राज्य सरकारने या हत्येचा तपास सीआयडीकडे सोपवला. त्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्यात आलं आहे. त्यामधील आरोपींना शिक्षा झाली. तर काही आरोपींना जामीन मिळाला होता.

follow us

संबंधित बातम्या