Ashok Chavan : राज्यात सध्या अनेक प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. सरकारकडून फक्त राजकीय खेळ्या करून आश्वासने देऊन वेळ मारून नेण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे विरोधकांचा संताप झाला आहे. अशातच आता काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी फिल्मी स्टाइल डॉयलॉगद्वारे शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या कारभाराचा पंचनामा केला आहे. चव्हाण यांनी केलेल्या या ट्विटची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे.
“तारीख पर तारीख मिलती है… लेकिन इन्साफ नहीं मिलता माय लॉर्ड, इन्साफ नहीं मिलता! मिली है तो सिर्फ ये तारीख”, या दामिनी चित्रपटातील सुपरहिट डायलॉगमधून अभिनेते व आज भाजपाचेच खासदार असलेले सनी देओल यांनी आपला उद्वेग व्यक्त केला होता. तशीच काहीशी वेळ आज महाराष्ट्राच्या नागरिकांवर ओढवली आहे. बंडखोर आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी, मराठा समाजाचे आरक्षण, ओबीसींचे राजकीय आरक्षण, धनगर समाजाचे आरक्षण अशा अनेक महत्वाच्या प्रश्नांना अलिकडेच एकच उत्तर मिळतंय. ते म्हणजे “तारीख पे तारीख”, अशा आशयाचे ट्विट चव्हाण यांनी केले आहे.
"तारीख पर तारीख मिलती है… लेकिन इन्साफ नहीं मिलता माय लॉर्ड, इन्साफ नहीं मिलता! मिली है तो सिर्फ ये तारीख", या दामिनी चित्रपटातील सुपरहिट डायलॉगमधून अभिनेते व आज भाजपचेच खासदार असलेले सनी देओल यांनी आपला उद्वेग व्यक्त केला होता.
तशीच काहीशी वेळ आज महाराष्ट्राच्या नागरिकांवर…— Ashok Chavan (@AshokChavan1958) September 27, 2023