Sujay Vikhe vs Balasaheb Thorat : अहिल्यानगर जिल्ह्यात थोरात-विखे पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वांना माहिती आहे. गेली अनेक दिवसांचा हा संघर्ष आहे. भोजापूर पाण्यावरून हा राजकीय संघर्ष आता पुन्हा पेटला आहे. (Thorat) यात थोरात-विखे पाटील पिता-पुत्र यांच्यातील राजकीय संघर्षामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.
दोन्ही बाजूनं एकमेकांना जोरदार उत्तरं दिली जात आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातांनी पोरं-बाळ, अशा केलेल्या टीकेवर भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटलांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ते मोठे नेते आहेत, ते सल्ला देण्यासाठीच आहेत. जी भूमिका ते आज घेत आहेत तीच भूमिका विधानसभा निवडणुकी वेळी घेतली पाहिजे होती असं सुजय विखे म्हणाले.
महाराष्ट्राचे नेते व्हायला निघाले; आधी तालुक्यात पाहा; सुजय विखेंचा रोहित पवारांना खोचक टोला
पोरं-बाळांवर बोलायचं नव्हतं, तर विधानसभा निवडणुकीत प्रत्येक भाषणात माझ्यावर का बोलले? अमोल खताळ यांना खबरी का म्हटलं? सुजय विखे यांना पळून लावलं, काट्यात लपला होता, काटे काढत असेल, त्यावेळेस आम्ही पोरं-बाळ नव्हतो, आज तुमचा पराभव झाला, तर आम्ही ‘पोरं-बाळ’ झालो का असा सवालही विखे यांनी उपस्थित केला आहे.
बाळासाहेब यांचा आम्ही सन्मान करतो, पोरं-बाळ म्हणण्याची त्यांनी चूक केली, याच पोरा-बाळांनी त्यांचा पराभव केला. युवाशक्ती प्रचंड आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात कुणाचीही दंडेलशाही चालत नाही. सर्वसामान्य माणूस आमदार होऊ शकतो, हे त्यांना कदाचित आजही पचत नाही, असा टोला विखे पाटलांनी थोरातांना लगावला आहे.