Download App

काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल उद्धव ठाकरेंना भेटणार…

काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचं समोर आलंय. पुढील आठवड्यात वेणुगोपाल मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यानूसार पुढील आठवड्यातचं ते उद्धव ठाकरेंना भेटणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पवारांच्या घरी मोदीही जातात ते कोणाला… अरविंद सावतांचा खोचक सवाल

सावरकर मुद्द्यानंतर महाविकास आघाडीचा घटक पक्ष काँग्रेस अधिक प्रमाणात सक्रिय असल्याचं दिसून येत नाही. नूकत्याचं छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दांडी मारली होती.

कलावंतांची परिस्थिती सांगता सांगता प्रिया बेर्डे पत्रकार परिषदेतच रडल्या

सभेला नाना पटोले गैरहजर असल्याचं कारण प्रकृती बरी नसल्याचं देण्यात आलं. मात्र, दुसऱ्याचं दिवशी नाना पटोलेंनी माझी प्रकृती ठणठणीत असून मी दुसऱ्यांची प्रकृती बिघडू शकतो, असं म्हंटलं होतं.

चंद्रकांत पाटलांना मनसेनं फटकारलं; दाखवला ‘तो’ व्हिडीओ

याआधी राहुल गांधी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटले होते. तसेच खासदार संजय राऊत यांना भेटले होते. त्यावेळी राज्यात काँग्रेसच्या नेत्यांकडून सकारात्मक संवाद होण्याच्या चर्चेसाठी महासचिव वेणुगोपाल यांनी पाठवणार असल्याचं गांधी यांनी स्षष्ट केलं होतं.

दरम्यान, वेणुगोपाल आणि उद्धव ठाकरे यांची पुढील आठवड्यात भेट होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या भेटीत सावरकर मुद्यावर चर्चा होणार असल्याचंही बोललं जातंय.

Tags

follow us