Congress Leader Kailas Gorantyal and Suresh Varpudkar will entered in BJP : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर राज्यामध्ये राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. त्यात भाजपकडून कॉंग्रेस आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या नेत्यांना गळाला लावून खिंडार पाडले जात आहे. त्यामध्ये आता कॉंग्रेसचे जालना जिल्ह्यातील माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते सुरेश वरपूरडकर हे भाजपमध्ये जाणार असल्याचं निश्चित झालं आहे.
Rashi Bhavishya : मेष, कन्या आणि धनु राशींसाठी भाग्यशाली इतरांचं काय? जाणून घ्या सविस्तर…
गेल्या काही दिवसांपासून कैलास गोरंट्याल हे कॉंग्रेसमध्ये नाराज असल्याचं बोललं जात होतं. त्यातून ते भाजपच्या एका मोठ्या नेत्याच्या संपर्कात आले आणि ते कॉंग्रसचा हात सोडून कमळ हाती घेणार असल्याचं निश्चित झालं. दरम्यान आता या वृत्तावर शिक्का मोर्तब झालं आहे. कारण आता उद्या मंगळवार 29 जुलैला कॉंग्रेसचे जालना जिल्ह्यातील माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते सुरेश वरपूरडकर हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
भाषणात बोलता बोलता कधी कधी घसरतो; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी संग्राम जगतापांचे टोचले कान
मुंबईमध्ये भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये कॉंग्रेसचे जालना जिल्ह्यातील माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते सुरेश वरपूरडकर यांचा हा प्रवेश पार पडणार आहे. दुपारी तीन वाजता हा प्रवेश होणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान या प्रवेळानंतर मराठवाड्यामध्ये भाजपला ताकड मिळणार आहे.
मोठी बातमी! टीम इंडियाचा इंग्लंडला दणका, चौथा सामना अनिर्णित; जडेजा-सुंदर चमकले
दुसरीकडे कॉंग्रेसचे जालना जिल्ह्यातील माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते सुरेश वरपूरडकर यांच्या प्रवेशामुळे मराठवाड्यातील जालना, नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील राजकीय समीकरणं प्रचंड बदलू शकतात. कारण भाजपची ताकड वाढल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मराठवाड्यामध्ये भाजपची कमान येऊन कॉंग्रेस आणि मविआच्या जागा घटू शकतात. असं देखील बोललं जात आहे.