Rashi Bhavishya : मेष, कन्या आणि धनु राशींसाठी भाग्यशाली इतरांचं काय? जाणून घ्या सविस्तर…

Todays Horoscope 28 July 2025 : आजच्या राशिभविष्यानुसार मेष, कन्या आणि धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्यशाली ठरणार आहे, कारण आज चंद्र सिंह राशीतून कन्या राशिमध्ये प्रवेश करणार आहे. तसेच इतर राशींच काय जाणून घेऊ सविस्तर…
भाषणात बोलता बोलता कधी कधी घसरतो; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी संग्राम जगतापांचे टोचले कान
मेष – मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आशादायी असणार आहे. तुम्हाला तुमच्या कामांमध्ये यश मिळेल. तुमच्या इच्छा पूर्ण होतील. करिअरमध्ये मेहनतीला फळ मिळेल. व्यापारात नव्या संधी मिळतील. आज वरिष्ठ लोकांशी भेटीगाठी होण्याची शक्यता दाट आहे. तसेच विद्यार्थ्यांची मेहनत आज आर्थिक स्वरूपात त्यांना लाभ देऊ शकते. तसेच नातलग आणि मित्रमंडळींसोबत वेळ घालवण्याची संधीही मिळू शकते.
मोठी बातमी! टीम इंडियाचा इंग्लंडला दणका, चौथा सामना अनिर्णित; जडेजा-सुंदर चमकले
वृषभ – वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक आहे. तुम्हाला यश मिळाल्याने तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. त्यामुळे तुमचे विचार आणि निर्णय यावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. जेणेकरून तुम्ही सहज तुमचं ध्येय साध्य करू शकता. मात्र आज विरोधकांपासून सतर्क रहा. कुणावरही लगेच विश्वास ठेवू नका वाद टाळा.
मिथुन – मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा आव्हानात्मक असेल. रोजच्या कामांमध्ये देखील सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. छोट्या-छोट्या गोष्टींमधून अडचणी निर्माण होऊ शकतात. खाजगी जीवनात काही तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच व्यापारामध्ये देखील काही आकस्मित घटना घडू शकतात. त्यामुळे विचार करून पाऊल उचला. आजच्या दिवशी तुमचं ध्येय साध्य करण्यावर लक्ष केंद्रित करा.
कोकणात ठाकरेंना धक्का! आणखी एका नेत्याचा जय महाराष्ट्र; हाती घेणार धनु्ष्यबाण
कर्क – कर्क राशीच्या लोकांसाठी आजच्या दिवस यशस्वी असणार आहे. त्यांना त्यांच्या कामांमध्ये नवी संधी मिळेल. मेहनत फळाला येईल मात्र आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा काही समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच कर्क राशीच्या लोकांना आज त्यांच्या कुटुंब किंवा नातेवाईकातून काही आनंदाची बातमी मिळू शकते. ज्यामुळे तुमचं मन आनंदित होऊन जाईल. तसेच आज वैवाहिक जीवन सुखद आणि प्रेमाने भरलेला असेल. तर स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी आज चांगली बातमी मिळू शकते.
रशियाने घेतला युक्रेनचा धसका! प्रथमच घेतला ‘हा’ मोठा निर्णय; युद्धाच्या मैदानात काय घडतंय?
सिंह – सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडासा आव्हानात्मक असेल. आरोग्य कडे दुर्लक्ष करू नका. तसेच त्यांना आज त्यांच्या नातलगांकडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. जेणेकरून त्यांचं दिवस आनंदी जाणार आहे. नोकरदारांसाठी आजचा दिवस हा अत्यंत व्यग्र आणि तुमच्या कामांचं कौतुक होणारा ठरणार आहे.
बीड जिल्हा ओबीसींसाठी राखीव दिला का?, मंत्रिपदाला डावलल्याने प्रकाश सोळंकेंची उघड नाराजी व्यक्त
कन्या – कन्या राशीच्या लोकांसाठी आजच्या दिवस अत्यंत शुभ आहे. त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये यशाची नवे दरवाजे उघडू शकतात. त्यामुळे पूर्ण ताकदीने काम करा. व्यवसायामध्ये गुंतवणुकीमध्ये नव्या संधी मिळू शकतात. तसेच नोकरदारांना एखाद्या नव्या प्रोजेक्टची जबाबदारी मिळू शकते. ज्यामध्ये तुम्ही आज चांगलं काम करावे. तर खाजगी जीवनाबद्दल सांगायचं झालं तर आज तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर खास वेळ घालवण्याची शक्यता आहे.
बीड जिल्हा ओबीसींसाठी राखीव दिला का?, मंत्रिपदाला डावलल्याने प्रकाश सोळंकेंची उघड नाराजी व्यक्त
तूळ – तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काहीसा अडचणींचा असेल. त्यांच्या कामांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. काही वेळा तुमच्या योग्यतेवरही प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो. मात्र यामुळे खचून न जाता धैर्य कायम ठेवा. दुसरीकडे त्यांच्या खाजगी जीवनातही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जेणेकरून थकवा जाणू शकतो. त्यामुळे खाणे-पिणे आणि आरोग्याकडेही लक्ष द्या.
गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांसारखे काम करावे : अप्पर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे
वृश्चिक – वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काहीसा अडचणींचा आणि कामांमध्ये अयशस्वीता आणणारा असू शकतो. मात्र तरी देखील सकारात्मक दृष्टिकोन ठेवत पुढे जा. आरोग्याचा काळजी घेऊन आजची काम करा. या राशीचे लोक आज दिवसभर कामात व्यस्त असण्याची दाट शक्यता आहे.
..त्या दिवसांत मी दोनदा मरता मरता वाचलो; धनंजय मुंडे वंजारी मेळाव्यात बोलताना झाले भावूक
धनु – धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत शुभ आहे. तुम्हाला तुमच्या प्रयत्नांमध्ये यश मिळेल. तसेच आर्थिक स्वरूपाचे फायदे देखील मिळणार आहे. तसेच पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीचा आज लाभ मिळू शकतो. नोकरदारांसाठी आज पगारवाढ किंवा पदोन्नती सारख्या आनंदाच्या बातम्या मिळू शकतात.
“पोलिसांनीच अमली पदार्थ प्लांट केले, प्रांजल खेवलकरांना..”, कोर्टात जोरदार युक्तिवाद, काय घडलं?
मकर – या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आशादायी असणार आहे. मात्र तुम्हाला तुमच्या लक्षात पर्यंत पोहोचण्यासाठी अधिक कष्ट घ्यावे लागू शकतात. तसेच आज कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मानसिक आनंद मिळेल. यातून तुमचे नाते आणखी दृढ होण्यास मदत होईल.
हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला मारहाण; पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यावर नागेश यांनी घेतला मोठा निर्णय
कुंभ – या राशीच्या लोकांना आजचा दिवस काहीसा आव्हानात्मक असणार आहे. त्यामुळे व्यवसाय आणि खाजगी जीवनात सावधानता बाळगणं गरजेचं आहे. चुकूनही अवास्तविक धाडस करू नका. आसपासच्या लोकांची मदत घ्या तसेच आज मित्रांमध्ये चांगला संपर्क ठेवा.
हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला मारहाण; पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यावर नागेश यांनी घेतला मोठा निर्णय
मीन – मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काहीसा अडचणींचा असू शकतो. ज्यामध्ये तुम्हाला मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित ठेवायचा आहे. कुठलाही निर्णय घाईमध्ये घेऊ नका. काम करताना धैर्य ठेवा त्याचबरोबर नात्यांमध्ये आज स्थिरता ठेवण्यावर लक्ष केंद्रित करा. जेणेकरून अडचणींवर मात करत तुमचा आत्मविश्वास वाढेल.