..त्या दिवसांत मी दोनदा मरता मरता वाचलो; धनंजय मुंडे वंजारी मेळाव्यात बोलताना झाले भावूक

..त्या दिवसांत मी दोनदा मरता मरता वाचलो; धनंजय मुंडे वंजारी मेळाव्यात बोलताना झाले भावूक

Dhananjay Munde : ज्या समाजात जन्माला आलो, त्याचा अभिमान निश्चित आहे. (Munde) अडचणीच्या काळात ज्याला धनंजय मुंडेंचा नंबर आठवतो, यापेक्षा दुसरं काय हवं? मंत्रिपदाला काय चाटायचं आहे का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. माझ्यावर कृषिमंत्री असताना आरोप केले. नियतीने, न्यायव्यवस्थेने न्याय दिला. ज्यांनी कटकारस्थान केलं, त्याच्या विरोधातच लाख रुपयाचा दंड झाला. सत्य परेशान हो सकता है, पराजित नही. पुढेही संघर्षातून, संकटातून जावं लागेल असं धनंजय मुंडे म्हणाले. ते वंजारी समाजाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात बोलले आहेत.

मला जर बाजूला केलं नसतं तर एका मंत्री मंडळात बहीण-भाऊ मंत्री झाले नसते. आज जे काही माझ्यासोबत झालं मी राजकीय जीवनात आहे ते सर्व स्वीकारेन. टीका स्वीकारेन, व्यक्ती म्हणून धनंजय मुंडेवर टीका करा. जर धनंजय मुंडे चुकलाय तर त्याला कधीच माफ करू नये. प्रत्येकाने करावं तो विषय धनंजय मुंडेपर्यंत असावा. धनंजय मुंडेंच्या जातीपर्यंत नसावा. धनंजय मुंडेंच्या जिल्ह्यापर्यंत आई, बाप, मुलाबाळापर्यंत हे कधीच झाले नाही. माझ्यासह, जात माझ्यासह इतर जात आणि माझ्यासह माझा जिल्हा एवढा बदनाम करावा. एक-दोन दिवस नाही, दोनशे दिवस एखाद्या जिल्ह्याची, एखाद्या व्यक्तीची, एखाद्या व्यक्तीच्या जातीची मीडिया ट्रायल कधीच कोणी केली नाही, ते मी सहन केले. त्या दोनशे दिवसात मी दोन वेळा मरता-मरता राहिलोय. तुमच्या कृपेमुळे ही गोष्ट फक्त लहाने साहेबांना माहिती आहे.

मोठी बातमी! धनंजय मुंडे पुन्हा मंत्री होणार? अजितदादांचा तसाच सूर म्हणाले;आम्ही मुंडेंना..

इतके दिवस तुम्ही बोलावत नव्हता. म्हणून मला येता येत नव्हते. आता तुम्ही बोलावलं तर मी आलोय. जीवनातला पहिला संघर्ष डोळ्यासमोर मुंडे साहेबांचा पाहिला. जीवनातला प्रवास आठवला तरी आता सुद्धा अंगावर शहारा येतो. स्वर्गीय मुंडे साहेबांसोबत संघर्षाच्या काळात सावलीसारखा होतो. त्यांचा संघर्ष मी बघितला. त्या संघर्षातून ते जिथपर्यंत पोहचले तेही पाहिलं. जे व्हायला नको होत ते झालं. पण कधी-कधी वाटत की साहेबांची एवढी दूरदृष्टी होती.

संघर्षात काय करायचं तर संयम ठेवायचा. गप्प राहिलो नसतो तर मला जो आजारपणा आला, तो आला नसता. कारण माझा स्वभाव व्यक्त होण्याचा आहे. माझ्या वाणीवर सुद्धा सरस्वती मातेची कृपा आहे. जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष होईपर्यंत कधीच साहेबांच्या स्टेजवर मी नसायचो. संघर्षाच्या काळात आपण माझ्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिले. माझ्या स्वतःच्या अंगाची, माझ्या कातड्याची जोडी जरी आपल्या पायात घातली तरी ते फेटू शकत नाही, असे त्यांनी यावेळी म्हटले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube