मोठी बातमी! धनंजय मुंडे पुन्हा मंत्री होणार? अजितदादांचा तसाच सूर म्हणाले, “आम्ही मुंडेंना..”

मोठी बातमी! धनंजय मुंडे पुन्हा मंत्री होणार? अजितदादांचा तसाच सूर म्हणाले, “आम्ही मुंडेंना..”

Ajit Pawar on Dhananjay Munde : राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने एका (Dhananjay Munde) प्रकरणात क्लिनचीट दिली. मुंडे कृषिमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात कृषी साहित्याची थेट खरेदीचा निर्णय योग्यच होता असा निर्वाळा न्यायालयाने दिला. यानंतर मुंडेंचं पुनर्वसन होणार, त्यांना पुन्हा मंत्रिपद मिळणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही सकारात्मक संकेत दिले आहेत. तर आम्ही धनंजय मुंडेंना संधी देऊ असे वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

अजित पवार यांनी आज पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पत्रकारांनी त्यांना धनंजय मुंडे यांच्याबाबतीत विचारले असता ते म्हणाले, धनंजय मुंडेंच्या बाबतीत तुम्ही पेपरमध्ये वाचलं. त्यांच्यावर कृषी विभागाच्या संदर्भात जे आरोप झाले त्यात न्यायालयाने काय सांगितलं कुठेही त्यांचा दोष नाही त्यांना क्लिनचीट दिली. परंतु, त्यांची जी काही बदनामी व्हायची ती झाली. यातून बाहेर पडताना त्यांना जो त्रास सहन करावा लागला. मनस्ताप झाला. त्यांच्या कुटुंबियांना जो मनस्ताप झाला तो पुन्हा भरून येऊ शकत नाही.

धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती.. बाळा बांगर यांचा गंभीर आरोप

कृषीच्या बाबतीत त्यांच्यावर जे आरोप झाले आहेत ते मी म्हणत नाही न्यायालयाने सांगितलं आणि ज्यांनी ते आरोप केले त्यांनाही न्यायालयाने एक लाख रुपयांचा दंड केला आहे. आपल्याकडे न्याय व्यवस्था सर्वोच्च आहे. त्यांनी दिलेला तो निर्णय आहे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

..तर धनंजय मुंडेंना पुन्हा संधी देऊ

धनंजय मुंडेंना पुन्हा संधी मिळणार का असे विचारले असता अजित पवार म्हणाले, त्या संदर्भात अजून एका गोष्टीच्या संदर्भात आम्ही माहिती घेत आहोत. त्याची न्यायालयीन चौकशी सुरू आहे. चौकशी झाल्यानंतर त्या बद्दलचे सर्व वस्तुस्थिती पुढं येईल. यात अशाच पद्धतीने जर त्यांचा दुरान्वयानेही संबंध नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा संधी देऊ अशा स्पष्ट शब्दांत अजित पवार यांनी उत्तर दिले.

मारकुट्या सूरज चव्हाणला दादांचा धक्का; त्वरीत राजीनामा देण्याचे अजित पवारांचे आदेश

follow us
  • fb
  • instagram
  • youtube