कोकणात ठाकरेंना धक्का! आणखी एका नेत्याचा जय महाराष्ट्र; हाती घेणार धनु्ष्यबाण

Uddhav Thackeray : राज्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी (Maharashtra Local Body Elections) सुरू झाली आहे. महायुतीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला मात्र धक्क्यांवर धक्के बसत आहेत. आघाडीतील तिन्ही पक्षांना गळती लागली आहे. यातही ठाकरे गटाला मोठा फटका बसला आहे. आतापर्यंत अनेक नेते पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आहे. आताही ठाकरेंना आणि आमदार भास्कर जाधव यांना धक्का देणारी बातमी कोकणातून आली आहे. रत्नागिरीच्या गुहागरमधील ठाकरे गटाच्या महिला नेत्या आणि माजी जिल्हा परिषद सदस्या नेत्रा ठाकूर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. ठाकरे गटाला मोठा फटका बसला. या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचे फक्त 20 आमदार निवडून आले. या निवडणुकीनंतर अनेकांनी आपलं राजकीय भवितव्य सेफ करण्यासाठी महायुतीतील पक्षांत जाणे पसंत केले. त्यामुळे महायुतीतील तिन्ही पक्षांत इनकमिंग सुरू झाली. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने पक्षांतराचा वेग वाढला आहे. ठाकरे गटाला जोरदार धक्के बसू लागले आहेत.
एका रात्रीत मित्राचा शत्रू होतो आणि शत्रूचा मित्र होतो; उद्धव ठाकरेंना पुन्हा भाजप नेत्याची ऑफर
आताही गुहागरमधील महिला नेत्या नेत्रा ठाकूर यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे. ठाकूर लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासह आमदार भास्कर जाधव यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. निवडणुका जवळ आलेल्या असतानाच या घडामोडी घडत आहेत. त्यामुळे पक्षबांधणीच्या आव्हानासह ठाकरे गटाला निवडणुकांना सामोरे जावे लागणार आहे.
माजी मंत्री रामदास कदम यांनी या घडामोडींवरुन आमदार भास्कर जाधव यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तुम्ही काँग्रेससोबत गेलात आणि आम्हाला निष्ठा शिकवता असा सवाल त्यांनी भास्कर जाधवांना विचारला. माजी आमदार संजय कदम पुन्हा आपल्या कुटुंबात आले. कदम यांच्याबाबतीत महामंडळाचा एखादा निर्णय व्हावा अशी विनंती कदम यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.
मी घरी बसायचा निर्णय घेतला होता. पण शिंदे साहेबांनी मला पुन्हा कामाला लावलं. वय झालं असलं तरी आता थांबणार नाही. कोण तो अनिल परब, त्याच्या आरोपांना आम्ही भीक घालत नाही. 35 ची नोटीस दिल्याशिवाय सभागृहात आरोप करता येत नाहीत. मग हे कसं झालं? हे काय मॅनेज झालं का? असा सवाल रामदास कदम यांनी विचारला.
उद्धव ठाकरे भिकेचा कटोरा घेऊन भाजप अन् राज ठाकरेंकडे.. रामदास कदमांचा मोठा गौप्यस्फोट